Become a "true friend" of the municipality 
नागपूर

महापालिकेचे "सच्चे दोस्त' बना

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अंबाझरी येथील स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ काल सायंकाळी तरुणाईने एकच गर्दी केली. निमित्त होते महापौर संदीप जोशी यांचे आवाहन. उपमहापौर मनीषा कोठे यांनी महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेची घोषणा करीत "महापालिकेचे सच्चे दोस्त बना', असे आवाहन केले.


महापौर संदीप जोशी यांनी 14 फेब्रुवारी रोजी अंबाझरी येथील विवेकानंद स्मारक येथे "माय हार्ट माय नागपूर' हा सेल्फी पॉइंट उभारल्यानंतर यामागील संकल्पना आज जाहीर करण्याचे ठरविले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोमवारी सायंकाळी तरुणाईने विवेकानंद स्मारक येथे गर्दी केली. उपमहापौर मनीषा कोठे यांनी नव्या उपक्रमाची जाहीर घोषणा केली. यावेळी धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, उपनेत्या वर्षा ठाकरे, नगरसेविका परिणिता फुके यांची उपस्थिती होती. विवेकानंद स्मारकावर तरुणाई एकवटली. आर. जे. सौरभ, आर. जे. दिव्या, आर. जे. राजन, आर. जे. पल्लवी यांनी तरुणाईचे मनोरंजन केले. जबाबदारीची जाणीव ठेवत तरुणाईने अनेक विधायक कामात स्वत:ला झोकून दिले आहे. अशा तरुणाईला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी "सच्चा दोस्त' संकल्पना मांडली. विधायक कामे कुणी करीत असेल तर त्यांनी त्यांच्या कामाची माहिती द्यावी. गुगल फॉर्म भरून संपूर्ण माहिती दिली की नागपूर महानगरपालिका या सर्वांना एका मंचावर आणणार आहे. त्यांच्या कामाची माहिती नागपूरकरांना करवून देत नागपूरच्या विकासासाठी त्यांचा उपयोग कसा करता येईल, याची माहिती एका कार्यक्रमातून देण्यात येईल. नोंदणी केलेले सर्व व्यक्ती "सच्चे दोस्त' बनतील. या चळवळीच्या माध्यमातून नागपूर देशात क्रमांक एकचे शहर बनविण्याचा महापौर संदीप जोशी यांचा मानस आहे. आपल्या शहराविषयी आत्मीयता निर्माण झाल्याशिवाय हे शक्‍य नाही, म्हणूनच "माय हार्ट माय नागपूर'च्या माध्यमातून "सच्चे दोस्त' चळवळ उभारण्यात येत असल्याचे उपमहापौर मनीषा कोठे यांनी जाहीर केले.


"सच्चे दोस्त' बनण्यासाठी हे करा

महानगरपालिकेचे "सच्चे दोस्त' बनण्यासाठी "नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन' या फेसबुक पेजला भेट द्या. तेथे "सच्चा दोस्त' चळवळीत सहभागी होण्यासाठी क्‍यू आर कोड आणि लिंक दिली आहे. क्‍यू आर कोड स्कॅन करून अथवा लिंक क्‍लिक केल्यानंतर येणारा फॉर्म भरा आणि सबमीट करा. लवकरच महानगरपालिका या सर्व सच्च्या दोस्तांना एका मंचावर आमंत्रित करून पुढील कार्यक्रम जाहीर करणार आहे.

"हिरो ऑफ द मंथ'ची घोषणा

"सच्चे दोस्त' चळवळीच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या तरुणाईला प्रोत्साहन देण्याची घोषणा करण्यात आली. महानगरपालिका आणि अंकुर सीडस्‌तर्फे "हिरो ऑफ द मंथ' असा पुरस्कार देण्यात येणार आहे. 11 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप राहील. स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तिगत अशा दोन वर्गवारीत हे पुरस्कार पुढील वर्षभराकरिता देण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! उकाड्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता; पुढील दोन ते तीन दिवसांचा अंदाज

Mumbai: 'लालबागचा राजा'च्या दर्शनाच्या नावाखाली ४ भाविकांना गंडा, बारावीतील विद्यार्थ्याला अटक

Patna Mother Murder : मुलानेच आईला जिवंत जाळलं; पोलिसांना म्हणाला- ‘मी देवाचा अवतार, कलियुग सुरूय, मीच तिला संपवलं'

Marathi News Live Updates : ममता बॅनर्जींची सर्वोच्च न्यायालयात धाव; TMC नाव आणि पारंपरिक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान

Badrinath Military Exhibition : बदरीनाथमध्ये मुख्यमंत्र्यांचा रायफल हातात घेत नेमबाजीचा सराव; लष्करी प्रदर्शनाची घेतली पाहणी

SCROLL FOR NEXT