Betel Tycoon on FDI Radar 
नागपूर

सुपारी किंग एफडीआयच्या रडारवर, सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर :  सुपारी हब म्हणून ओळख निर्माण केलेल्या नागपूर शहरात सलग दुसऱ्या दिवशी अन्न व औषधी प्रशासन विभागाने सुपारीच्या गोदामावर छापा टाकून 52 लाखाचा साठा जप्त केला. विभागाने शुक्रवारी केलेल्या कारवाईत एक कोटीची सुपारी ताब्यात घेतल्याने खळबळ माजली असताना दुसऱ्या दिवशीही कारवाई केल्याने व्यावसायिकांना धक्का बसला आहे. 


शहरात नित्कृष्ट दर्जाची सुपारी विकल्या जात असल्याच्या माहितीवरून सुराबर्डी येथील मदन कॉम्प्लेक्‍स हायलॅंड पार्क रोड येथील विजयकुमार हरिश्‍चंद्र शुक्‍ला यांचे मालकीचे ए.व्ही.जे. लॉजीस्टीक लिमिटेड या प्रतिष्ठानांच्या गोदामावर अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. दरम्यान, गोदामाची तपासणी केली असता तेथील सुपारीचे नमुने घेण्यात आले. सदर सुपारी नित्कृष्ट दर्जाची असल्याच्या संशयावरुन 24 हजार 498 किलोचा साठा जप्त केला. त्याची अंदाजे किंमत 52 लाख 73 हजार 194 रुपये आहे. 

रिअल इस्टेटला झळाळी येणार; या सर्वेक्षणातून संकेत

अन्न व औषधी प्रशासनाने मागील वर्षात सुपारीचे 38 नमुने विश्‍लेषणासाठी घेत एकूण 5 लाख 32 हजार 600 किलो सुपारी जप्त केली. त्याची किमंत अंदाजे दहा कोटी 50 लाख 46 हजार 977 रुपये आहे. यावर्षीही एप्रिल व मे या दोन महिन्यात आठ ठिकाणी छापे टाकून 39 हजार 379 किलो सुपारी ताब्यात घेतली. त्याची किंमत 95 लाख 38 हजार 945 रुपये आहे. अन्न व औषधी प्रशासनाने वेळोवेळी मोहीम राबवून कारवाई केली आहे. संपूर्ण कारवाई अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहआयुक्त चं.भा. पवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway route villages : शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील गावांची यादी आली; असा आहे मार्ग

Maharashtra Education DA Arrears: शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ महागाई भत्ता थकबाकी मार्च २०२६ च्या वेतनासह देण्याचे शिक्षण संचालकांचे आदेश

RR vs MI Live: मुंबई इंडियन्स - राजस्थान रॉयल्स सामना केव्हा सुरू होणार? षटकं कमी होत चालली, मॅच ५-५ ओव्हर्सची होणार? Cut-off time जाहीर

Mumbai News : कुलगुरूंच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डीबाटू विद्यापीठाचे २०२५ मधील हिवाळी परीक्षांचे निकाल जाहीर

Gadchiroli Accident : अपघातात दांपत्याचा मृत्यू; सहा वर्षांची चिमुकली झाली पोरकी

SCROLL FOR NEXT