Bhandara Crime  Esakal
नागपूर

Bhandara Crime: भर दुपारी घरात घुसून आई-मुलीवर युवकाचा चाकूहल्ला! प्रेमप्रकरणाची चर्चा; दोघीही जखमी

तुमसर शहरातील दुर्गानगरात एक महिला तिच्या अल्पवयीन मुलीसह घरी बसली असता एका युवक आत शिरला व अचानक धारदार शस्त्राने दोघींवरही प्राणघातक हल्ला केला.

सकाळ डिजिटल टीम

Bhandara Mother and Daughter got attacked: तुमसर शहरातील दुर्गानगरात एक महिला तिच्या अल्पवयीन मुलीसह घरी बसली असता एका युवक आत शिरला व अचानक धारदार शस्त्राने दोघींवरही प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दोघीही गंभीर झाल्या आहेत. ही घटना आज शुक्रवारी (ता. १ मार्च) दुपारी घडली. प्रेमप्रकरणातून हा हल्ला झाल्याची चर्चा आहे.

४५ वर्षांची सदर महिला दुपारी तिच्या १७ वर्षीय मुलीसह घरात होती. दीड वाजताच्या सुमारास अचानक आरोपी विश्वास चंद्रिकापुरे (२५) याने त्यांच्या घरात प्रवेश केला. विश्वासने धारदार शस्त्राने महिलेच्या मानेवर व मुलीच्या पायावर चाकूने हल्ला चढविला. आई व मुलीने घराबाहेर आरडाओरड करीत पळ काढला व शेजारच्या घरात जाऊन आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न केला.

सदर घटनेची माहिती होताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी केली. जखमींना भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राणघातक हल्ला करणारा आरोपी विश्वास चंद्रिकापुरे हा हल्ला केल्यानंतर लगेच घटनास्थळावरून पसार झाला आहे. तो तुमसर शहरातीलच कुंभारे नगरातील रहिवासी आहे. (Latest Marathi News)

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रश्मिता राव, पोलिस निरीक्षक नीलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय पंचबुधे, गिते, जयसिंग लिल्हारे हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचा तपास सुरू करण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे 500 कोटींच्या नोटिशीला 26 पानी उत्तर; सतीश सालियान यांचे सर्व आरोप फेटाळले

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : राज्यातील दुष्काळावरून अभिजीत दिपकेंचा सरकारवर निशाणा; म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट बघू नका’

SCROLL FOR NEXT