Crime esakal
नागपूर

Crime: घरगुती वाद विकोपाला! संतापलेल्या सासऱ्याने सुनेच्या मानेवार कुऱ्हाडीने वार करत केली हत्या

रुपेश नामदास

मोहाडी: घरगुती वाद विकोपाला गेल्याने संतापलेल्या सासऱ्याने सुनेच्या मानेवारी कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना मोहाडी तालुक्यातील रोहणा येथे घडली. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

मृत सुनेचे नाव प्रणाली ऊर्फ पिंकी सतीश ईश्वरकर (वय ३०) असून आरोपी सासऱ्याचे नाव बळवंत रघू ईश्वरकर (वय ५८) असे आहे.

रोहणा येथील मृताच्या पतीचे गावातील चौकात किराणा दुकान असून तो सकाळी दुकानात गेला होता. सासरा सकाळी शेतातून दूध घेऊन घरी आला. तेव्हा सून पिंकी अंगणात भांडे घासत होती.

दरम्यान दोघांमधील वाद विकोपाला गेल्याने सासऱ्याने पिंकीच्या मागून मानेवर कुऱ्हाडीने वार केला. यात पिंकीचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळी घरात इतर कोणीही नव्हते. त्यानंतर आरोपीने स्वत: मोहाडी येथे जाऊन पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून सुनेचा खून केल्याची कबुली दिली.

आरोपी गेल्यानंतर अंगणात मृतदेह तसाच पडून होता. काही वेळाने लहान मुले खेळता खेळता अंगणात आले असता त्यांना पिंकी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.

जवळ असलेल्या भांड्यांवरही रक्ताचे शिंतोडे उडाले होते. तेव्हा लहान मुलांनी याबाबतची माहिती पिंकाच्या पतीला दिली.

त्यानंतर सतीश घरी आल्यावर या घटनेची माहिती गावात पसरली. मोहाडी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृत पिंकीला ३ वर्षाचा मुलगा आहे.

सासऱ्याने रागाच्या भरात केलेल्या कृत्यामुळे ३ वर्षाचा मुलगा आईविना पोरका झाला आहे. मोहाडी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार पुल्लरवार व त्यांची चमू करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांच्या निशाण्यावर आता एकनाथ शिंदेंचा मंत्री; विधिमंडळात खडाजंगी, नेमकं काय घडलं?

Vidhan Bhavan: 'सभापती राम शिंदेचं कौतूक पहायला आई पोहोचली विधानभवनात'; इरकलचं लुगडं, डोक्यावर पदर...!

Medical Education: वैद्यकीय महाविद्यालयात गैरवैद्यकीय शिक्षकांचे प्रमाण वाढविण्यास एमएसएमटीएचा विरोध; शॉर्टकट उपाय नको

Video: स्टेजवर एंट्री होताच नवऱ्यानं केलं असं काही, नवरी सुद्धा लाजली...पाहा व्हिडिओ

Gold Rate Today: आज सोन्या-चांदीचे भाव स्थिर; भविष्यात भाव वाढणार का?

SCROLL FOR NEXT