नागपूर

आंबेडकर म्हणाले, धर्म हा व्यक्तिगत विषय, सरकारने ढवळाढवळ करू नये

राजेश प्रायकर

नागपूर : धर्म हा व्यक्तिगत विषय आहे. यात सरकारचा हस्तक्षेप नको. संविधानात धर्माचे स्वातंत्र आहे. काही राज्यांनी धर्मांतरणाचा केलेला कायदा हा मुळातच योग्य नाही. कोट्यवधी लोक बौद्ध धर्माच्या वाटेवर आहे. २०२५ मध्ये भव्य धर्मांतरण सोहळा घेण्यात येणार असल्याची माहिती भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी दिली.

कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले असता रविभवन येथे पत्रकारांशी बोलत होते. एससी, एसटी, ओबीसीसह एकूणच बहुजन समाजाचा मूळ धर्म बौद्ध धम्म आहे. यावर आता विविध समाज घटक उघडपणे चर्चाही करू लागले आहेत. आपल्या मूळ धम्मात परतण्याची लोकांची इच्छा बळावत चालली आहे. मागील काही वर्षांतील देशातील परिस्थितीही याला कारणीभूत आहे. मागास लोकांनी दुय्यम वागणूक मिळत आहे. हे लोकांच्या लक्षात येत आहे, असेही ते म्हणाले.

भारतीय बौद्ध महासभा देशभरात फिरून जनजागृतीचे कार्य करीत आहे. परंतु, हे करीत असताना कुठलाही द्वेश, टीका केली जात नाही. केवळ समता, बंधुता, न्याय, बुद्धाचे तत्त्व समजावून सांगितले जाते. त्याची तयारी सुरू असून २०२५ मध्ये हा धम्मदीक्षेचा कार्यक्रम होईल. यासाठी ऑनलाइन बुकिंग केली जात आहे. यासाठी भारतीय बौद्ध महासभेकडून जनजागृती करण्यात येत आहे. केंद्र सरकार मागासवर्ग विरोधी आहे. खासगीकरणामुळे मोठे नुकसान होणार आहे. देशातील बौद्ध धार्मिक स्थळ अतिक्रमण मुक्त करण्याचा लढाही उभारण्यात येणार असल्याचे आंबेडकर म्हणाले.

लिडरशिप टिकविण्यासाठी आघाडी

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते रिपब्लिकनच्या नावे आघाडी तयार करतात. आपली लिडरशिप टिकविण्यासाठी अशा प्रकारचा प्रयत्न त्यांच्याकडून होत असल्याची टीका आंबेडकर यांनी केली.

दलांचा एकजुटीचा प्रयत्न

एकजूट राहण्याची गरज आहे. समता सैनिक दलही विविध गटात विखुरला आहे. त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. ऑक्टोंबर महिन्यात दिल्लीत बैठक सुद्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT