nagpur crime news 
नागपूर

थंडीचा कहर... नागपुरात चोरट्यांनी दुचाकी जाळून हात शेकले!

ओमकार वाबळे

देशभरात पारा घसरल्याने थंडीचा तखाडा जाणवतोय. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात याचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटवण्यात येत आहेत. थंडी घालवण्यासाठी लोकं उब शोधत आहेत. अशातच पोलिसांनी चोरट्यांचा किस्सा सांगितला. नागपूर पोलिसांनी दुचाकी चोरांना पकडलंय खरं, पण त्यांनी दुचाकी का जाळली, याचं कारण ऐकून पोलीस अवाक झाले. (nagpur crime news)

संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणात थंडी पडली आहे. नागपुरातही पारा 7 अंशांपर्यंत खाली गेला आहे. नागपुरात पोलीस काही दिवसांपासून दुचारी चोरांच्या शोधात होते. कारण पोलीस स्टेशनच्या (Nagpur Police) आवारातून 10 दुचाकी चोरीस गेल्या होत्या. अनेक दिवसांपासून पोलीस चोरट्यांच्या मागावर होते. पण शोधाशोध केल्यानंतरही चोरांचा मागोवा मिळत नव्हता. अखेर पोलिसांनी चोरट्यांचा पत्ता मिळवला. पण त्यांच्याकडे जळालेली दुचाकी पाहून त्यांना प्रश्न पडला. आणि यातून नवीनच माहिती समोर आली. (Bike Burnt in Nagpur)

कुख्यात चोर छोटा सर्फराज याने हे कृत्य केलंय. गेल्या काही दिवसांपासून या टोळीने शेतात दुचाकी लपवून ठेवल्या होत्या. यानंतर त्यांनी शेतातच लपण्यासाठी आसरा घेतला. पोलिसांनी त्यांना पकडल्यानंतर बाईक जळालेली सापडली. यशोधरा नगर पोलीस स्टेशन या ठिकाणी ही दुचाकी आणण्यात आली आहे.

शेतात लपून बसले खरे...पण थंडी सहन होत नव्हती!

पोलिसांपासून लपण्यासाठी चोरट्यांनी शहराबाहेर एका शेतात आसरा घेतला. पोलिसांच्या हाती लागू नये, म्हणून चोरांनी शहराबाहेर लपण्याची शक्कल लढवली. यावेळी थंडीचा कडाका वाढल्याने त्यांनी लाकडं शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐनवेळी काहीच सरपण न सापडल्याने त्यांनी सोबतची दुचाकीच पेटवून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games MMA : अवघ्या ७०० ग्रॅमने सुवर्णपदकाची संधी हुकली!; अाशियाई क्रीडा स्पर्धा ; सुचिका तारियालला मिक्स्ड मार्शल आर्ट्‌समध्ये ब्राँझपदक

फुलांची आरास अन् गणपतीचं गोंडस रूप! पुण्यात या ठिकाणी आहे नाना पाटेकरांचा गणपती; राहुल देशपांडेंनी शेअर केला फोटो

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Radhanagari Dam Gate Opens : राधानगरी धरणाचा क्रमांक तीनचा स्वयंचलित दरवाजा उघडला; धरणातून 2628 क्युसेक विसर्ग, घाटमाथ्यावर दमदार पाऊस

Kolhapur Gokul Election 2026 : आमदार, माजी आमदारांसह बडे नेते 'गोकुळ'च्या रिंगणात; एकाच दिवशी 133 इच्छुकांचे 205 उमेदवारी अर्ज दाखल, आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT