नागपूर

ग्रीन सिटीच्या हरितक्रांतीला ब्रेक : नर्सरी चालकांच्या चेहऱ्यावरील आनंद अन्‌ रोपटे कोमेजली

राघवेंद्र टोकेकर

नागपूर : कोरोना संसर्गाचा प्रभाव टाळण्यासाठी टाळेबंदी लावण्यात आली. मात्र त्यामुळे शहरातील हिरव्याकंच नर्सरी व्यवसायाला घरघर लागण्याची चिन्ह आहेत. व्यवस्थित निगा न राखता आल्याने कोमेजून गेलेल्या रोपट्यांमुळे या व्यवसायाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला असून, हंगाम संकटात सापडल्याने नर्सरी चालक हवालदिल झाले आहेत. दरवर्षी शहरात किमान वीस लाख रोपट्यांची विक्री होते मात्र यंदा ग्रीन सिटीच्या या हरितक्रांतीला ब्रेक लागणार असल्याचे चित्र आहे.

करोनामुळे देशभर सगळेच व्यवसाय थंडावले आहेत. नर्सरीचाही व्यवसाय गत तीन महिन्यांपासून पूर्णत: बंद असल्याने विविध प्रकारची फुले, फळे व शोभेच्या झाडांची विक्रीही थंडबस्त्यात आहे. लोक बाहेर पडत नसल्याने नर्सरीला ग्राहक भेट देत नाहीत शिवाय रोपट्यांची नियमित मशागत होत नसल्याने नर्सरीमालक आर्थिक संकटात सापडले आहेत.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी या उद्योगात मी चार ते साढेचार लाखांची गुंतवणूक करतो. दहा हजार चौरस फूटांवर असलेल्या नर्सरीसाठी महिन्याचे वेतन घेणारे आठ माणसे माझ्या नर्सरीत राबतात. शिवाय हिरवीकंच बहरलेली रोपटे नागपूरसह विदर्भ, छत्तीसगड व मध्यप्रदेशच्या सीमालगत पाठवतो. यंदा मात्र सारेच अंध:कारमय आहे.
धीरज वानखेडे, धीरज रोपवाटीका.

दरवर्षी कोट्यावधीचा मोबदला देणाऱ्या या व्यवसायाने नर्सरी चालकांची गुंतवणूक हिरावून घेतली आहे. त्यामुळे लवकरात लवकर सरकारने हरितक्रांतीची योजना न राबविल्यास कोमेजलेल्या नर्सरी व्यावसायिकांच्या चेहऱ्यावरील कळी कधी फुलेल हे सांगता येत नाही.

शोभिवंत फुलांना मागणीच नाही
लग्न समारंभासाठी फुलांची मोठी मागणी असते. मात्र, यंदा तोही व्यवसाय धोक्‍यात बुडाला आहे. घरगुती सजावटीसाठी शोभिवंत झाडांच्या कुंड्यांची मोठी मागणी असते. नर्सरी चालकांना त्यातून चांगले उत्पन्न मिळते; परंतु त्यावरही पाणी फेरले आहे. शिवाय कामगारांचे स्थलांतरण झाल्याने नर्सरीतील झाडे जगविण्यासाठी मालकांची धडपड सुरू आहे. हंगामासाठी केलेली गुंतवणूक अडकून पडली असल्याने लॉकडाऊन केव्हा संपेल, याच प्रतिक्षेत मालक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy Recruitment : देशभरातील औषधनिर्मात्यांसाठी नवे भरती‑पदोन्नती नियम लागू; पीसीआयची राजपत्रात अधिसूचना

Mumbai-Goa Highway: भरधाव वेगातील थारचं नियंत्रण सुटलं अन्..., दोन जणांचा जागीच मृत्यू; घटनेत कारचा चक्काचूर

Monsoon Alert: पुण्यात अखेर मॉन्सूनची दमदार एन्ट्री; कोकण-मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट, विदर्भात उष्णतेचा ऑरेंज इशारा कायम

'बिग बॉस मराठी' फेम अनुश्री मानेने दिली गुड न्यूज; खरेदी केलं स्वतःचं घर, गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत म्हणते- आज...

‘अ स्टोरी ऑफ टायटन’: यश, अपयश आणि स्वतःला शोधण्याच्या प्रवासाचं मानसशास्त्र

SCROLL FOR NEXT