BJP agitation against state government Allegation of load shedding cut off power supply nagpur sakal
नागपूर

राज्य सरकारविरोधात भाजपचे कंदील आंदोलन; अघोषित भारनियमनाचा आरोप

वीजटंंचाईला राज्य सरकारच जबाबदार असून अघोषित भारनियमाने हजारो कुटुंबीयांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण

- राजेश प्रायकर

संविधान चौक : कंदील पेटवून आंदोलन करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, माजी महापौर अर्चना डेहनकर, अशोक धोटे, शहर भाजपाध्यक्ष आमदार प्रवीण दटके, माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार कृष्णा खोपडे व इतर.

नागपूर : वीजटंंचाईला राज्य सरकारच जबाबदार असून अघोषित भारनियमाने हजारो कुटुंबीयांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच सुरक्षा अनामत रकमेत दुप्पट वाढ करून महाविकास आघाडी सरकारने नागरिकांवर आर्थिक भुर्दंड लादल्याचा आरोप करीत शहर व जिल्हा भाजपने आज सायंकाळी कंदील व मेणबत्ती पेटवून आंदोलन केले. भाजपने आजपासून राज्यव्यापी कंदील आंदोलनाची घोषणा केली होती. शहरातील संविधान चौकात अंधार पडताच भाजपने कंदील लावून आंदोलन केले. माजी उर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे, शहर भाजपाध्यक्ष प्रवीण दटके, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांच्यासह जिल्ह्यातील सर्व भाजप आमदारांच्या नेतृत्त्वात कंदील आंदोलन करण्यात आले.

देखभाल दुरुस्तीच्या फसव्या कारणाखाली लादलेले भारनियमन संपूर्ण मागे घेईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील अशी घोषणा भाजपच्या नेत्यांनी दिल्या. सरकारी कार्यालयांची हजारो कोटींची थकबाकी, सामान्य ग्राहकांच्या थकबाकी वसुलीसाठी वीज कापण्याची कारवाई, ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झालेली कोळशाची टंचाई, ऐन उन्हाळ्यात सक्तीने बंद ठेवलेली वीजनिर्मिती संयंत्रे अशा बेदरकार कारभारामुळे राज्याचे वीज व्यवस्थापन कोलमडल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार सत्तेवर असताना भारनियमनमुक्त असलेल्या महाराष्ट्रावर आघाडी सरकारने पुन्हा वीजटंचाई लादली. आर्थिक बेशिस्तीला आळा घालण्यासाठी एक अभ्यास गट नेमण्याची सूचना राज्य वीज नियामक आयोगाने सरकारला चार महिन्यांपूर्वी केली होती. अद्याप अशा अभ्यास गटाची नियुक्तीच झाली नसून वीज मंडळ मोडीत काढण्यासाठीच सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे असा आरोपही यावेळी करण्यात आला. सुरक्षा अनामत वसूल करण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा, अन्यथा विजेच्या प्रश्नावर महाराष्ट्रात मंत्र्यांना जागोजागी जाब विचारला जाईल, असा इशाराही आंदोलनातून देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT