Anil Deshmukh  Esakal
नागपूर

Anil Deshmukh : नागपुरात वज्रमूठ सभेवरून ठिणगी, गर्दीच्या धसक्याने भाजपचा विरोध?

भाजपचे आंदोलन : देशमुख म्हणाले, गर्दीच्या धसक्याने विरोध

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : येत्या १६ एप्रिलला महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा दर्शन कॉलनीतील मैदानावर होणार आहे. परंतु या मैदानाचा राजकीय वापर केला जात असून परवानगी रद्द करण्याच्या मागणीसाठी रविवारी भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

त्याचवेळी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी छत्रपती संभाजीनगरातील सभेतील गर्दीच्या धसक्याने भाजप काही लोकांना विरोधासाठी पुढे करीत असल्याचा आरोप केला. भाजप कार्यकर्त्यांनी सभास्थळी हनुमान चालिसा पठणचा इशारा दिला. त्यामुळे या सभेवरून भाजप-मविआ आमने-सामने येण्याची शक्यता असून राजकीय वातावरण तापण्याचे संकेत मिळत आहेत.

नागपुरात महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा होत आहे. या सभेसाठी देण्यात आलेल्या मैदानावरून भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी विरोध केला आहे. खेळाची मैदाने राजकीय सभेसाठी देऊ नका, परवानगी रद्द करा, असे पत्रच त्यांनी नासुप्र सभापतींना दिले आहे. महाविकास आघाडीनेही या मैदानावर सभा होणार असल्याचे स्पष्ट केले.

त्यानंतर रविवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी या मैदान परिसरात आंदोलन केले. एवढेच नव्हे तर मैदान सभेसाठी देण्याबाबत परवानगी रद्द न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भाजप व मविआ संघर्षाचे चित्र आहे.

रविवारी भाजपचे माजी नगरसेवक व नागरिकांनी या मैदान परिसरात आंदोलन केले. या मैदानावर सभेसाठी दिलेली परवानगी रद्द न केल्यास तीव्र आंदोलन व हनुमान चालिसा पठण केले जाईल, असा इशारा यावेळी माजी नगरसेवक हरीश दिकोंडवार यांनी दिला.

यावेळी धर्मपाल मेश्राम, बंटी कुकड़े, वंदना भुरे, मनीषा कोठे, राजेंद्र गोतमारे, समिता चकोले, पिंटू गिऱ्हे, विजय ढोले, सचिन वानखेड़े, अजय सराडकर, दिव्या धुरडे, अनिल राजगिरे, हेमंत आखरे, मंगेश साखरकर, आशिष कलसे, इब्राहिम चिड़ीवाले, शंकर गायधने, पप्पू सातपुते, संगीता आदमाने, अनधा आमले, मीना चरपे आदींनी घोषणा नासुप्र प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या.

सभेत सहा नेते करणार मार्गदर्शन

मविआच्या वज्रमूठ सभेसाठी रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत जंगी सभेचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या सभेत तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहतील. प्रत्येक पक्षाचे दोन नेते सभेला मार्गदर्शन करतील, असे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.

या मैदानाची क्षमता मोठी आहे. मविआच्या सर्व नेत्यांनी पाहणी करून सभेसाठी मैदान निश्चित केले. सभेसाठी रितसर परवानगी घेण्यात आली आहे. पहिली वज्रमुठ सभा छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. या सभेतील गर्दीचा धसका भाजपने घेतला आहे. त्यामुळे भाजप काही लोकांना पुढे करून विरोध करीत आहे.

- अनिल देशमुख, माजी गृहमंत्री, महाराष्ट्र.

दरम्यान, भाजपचे आंदोलन झाल्यानंतर माजी मंत्री सुनील केदार यांनी मैदानाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत मनपातील माजी विरोधी पक्षऩेते तानाजी वनवे, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, नरेंद्र जिचकार, विजय वनवे, प्रशांत ढोक उपस्थित होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT