Beating Murder sakal
नागपूर

Nagpur Crime : उधारीच्या वादातून भाजप कार्यकर्त्याचा खून

भारतीय जनता पक्षाच्या उत्तरप्रदेश आघाडीच्या महामंत्रीचा उधारीच्या वादातून तिघांनी मारहाण करीत खून केला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दवलामेटी परिसरात राहणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उत्तरप्रदेश आघाडीच्या महामंत्रीचा उधारीच्या वादातून तिघांनी मारहाण करीत खून केला. ही घटना मंगळवारी (ता.२) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

राजेश तिवारी (वय ४०) असे मृताचे तर तेज (वय ३२), करण आणि त्याचा साथीदार अशी आरोपींची नावे आहेत. तिवारी यांनी यांनी काही जणांकडून उधारी घेतली होती. मंगळवारी साडेबारा वाजताच्या सुमारास करण, तेज आणि त्यांच्या साथीदाराने तिवारी यांना घरातून बाहेर नेत जबर मारहाण केली व त्यांची दुचाकी घेऊन गेले.

भीतीमुळे तिवारी यांनी ही बाब कुणालाही सांगितली नाही. सकाळी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्राथमिक चौकशीतून वाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. यानंतर वैद्यकीय अहवालात त्यांच्या डोक्यावर मारल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळताच, पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: प्रसिद्ध कृष्णानंतर वॉशिंग्टन सुंदरलाही मालिकेतून केलं OUT! चाहत्यांना धक्का, पण दुखापत नसताना का घेतला हा निर्णय?

विमान अपघात घडवून आणण्याचा कट आधीच शिजलेला? कोणाचा सहभाग? 'यूएई'ने दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

IND vs WI: ४०६ धावांचा थरार, भारताचा विक्रमी विजय; पण गंभीर भडकला! ‘हे क्रिकेट नाही, फक्त बॅटिंग आहे’, खेळपट्टीवरून सुनावलं

Latest Marathi News Live Update: फुरसुंगीत सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्ध्वस्त

Diveagar Beach Drowning : रायगडमधील दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; पुण्यातून सहलीला गेलेल्या आठ जणांचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT