devendra fadanvis  esakal
नागपूर

Nagpur: फडणवीसांच्या नागपूरमध्येच भाजपला धक्का; 13 पैकी 9 पंचायत समित्या काँग्रेसकडे

प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच भाजपला मोठा धक्का

सकाळ डिजिटल टीम

नागपूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यातच भाजपच्या हाती काहीच लागले नाही. 13 पैकी एकाही पंचायत समितीमध्ये भाजपचा सभापती होऊ शकलेला नाही. उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये भाजपचा कुठल्याही पंचायत समितीत सभापती होऊ शकला नाही, तर अवघ्या दोन पंचायत समितीत उपसभापती झाले आहेत. मात्र, शिंदे गटाचा एक उपसभापती झाला आहे.13 पंचायत समिती पैकी 9 पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे सभापती निवडून आले आहेत. हा भाजपसाठी मोठा धक्का आहे.

नागपूर ग्रामीण, कामठी, सावनेर, कळमेश्वर, पारशिवनी,उमरेड, मौदा, कुही, भिवापुर या ठिकाणी कॉग्रेसचे सभापती झाले आहेत. तर, नरखेड, काटोल, हिंगणामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसचे सभापती झाले आहेत. तर शिंदे गटाचाही रामटेक पंचायत समितीवर एक सभापती झालेला आहे. फक्त रामटेक आणि मौदा तालुक्यात भाजपचे उपसभापती झालेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: भारताने विजयानंतर पाकिस्तानी खेळाडूंसोबत हात मिळवण्यास का दिला नकार? कर्णधार सूर्यकुमारने स्पष्ट शब्दात सांगितलं

IND vs PAK: 'पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांसोबत आम्ही उभे...' कर्णधार सूर्यकुमारची पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर मोठी प्रतिक्रिया

IND vs PAK, Asia Cup: भारतच ठरला 'बॉस', पाकिस्तानच्या ठेचल्या नांग्या; कर्णधार सूर्यकुमारचं वाढदिवशी भारतीयांना स्पेशल गिफ्ट

IND vs PAK, Asia Cup: अरर! पाकिस्तानच्या राष्ट्रगीतापूर्वी अचानक मैदानात वाजलं 'जलेबी बेबी'; Video तुफान व्हायरल

Vijay Vadettiwar: आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांकडून बनवाबनवी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका; लढा देण्याचा निर्धार

SCROLL FOR NEXT