file photo 
नागपूर

गट शिक्षणाधिकाऱ्यांचीच चूक! , विस्तार अधिकारी, शिक्षकाचे उत्तर सादर

नीलेश डोये

नागपूर : आदर्श शिक्षक पुरस्कार प्रकरणात रामटेकच्या गट शिक्षणाधिकारी, दोन विस्तार अधिकारी आणि संबंधित शिक्षकाकडून उत्तर सादर करण्यात आहे. विस्तार अधिकारी आणि शिक्षकाने संपूर्ण प्रकरणासाठी गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे बोट दाखवत एकप्रकारे त्यांनाच दोषी ठरविले आहे.

जि.प.कडून प्राथमिक गटातून १३ व माध्यमिक गटातून २ अशा १५ शिक्षकांना आदर्श शिक्षक या पुरस्काराने गौरविण्यात येते. आदर्श पुरस्कारासाठी शिक्षकाची निवड करताना गैरव्यवहाराच्या आरोपासोबत विभागीय चौकशी सुरू नसणे महत्त्वाचे निकष आहे. परंतु या निकषाला डावलून विभागीय चौकशी सुरू असलेल्या एका शिक्षकाची आदर्श पुरस्करासाठी निवड केली. वृत्त प्रकाशित होताच रामटेकच्या गट शिक्षणाधिकारी संगीता तभाणे, दोन विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि संबंधित शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

शिक्षकाला जाहीर करण्यात आलेला पुरस्कार थांबविण्याची नामुष्की जिल्हा परिषदेवर ओढवली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नोटीस बजावण्यात आलेल्या सर्वांनी आपले उत्तर सादर केले. गट शिक्षणाधिकारी सादर कर्ता अधिकारी आहेत. आदेशानुसार कारवाई केल्याचे रामटेकचे विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख यांनी सांगितले. तर दुसरे विस्तार अधिकारी यांनी, ‘तालुका स्तरावरून आलेल्या प्रस्तावाची छाननी करण्यात आली व तो समितीकडे पाठविण्यात आला. विभागीय चौकशीचा उल्लेख त्यात नव्हता’, असे स्पष्ट नमूद केल्याची माहिती आहे.

संबंधित शिक्षकानेही गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे बोट दाखविले. त्यांच्या मौखिक आदेशावरून प्रस्ताव सादर केला. विभागीय चौकशी सुरू असल्यास प्रस्ताव करू नये किंवा याबाबतच्या अटी संदर्भात कुठलीही माहिती त्यांनी दिली नसल्याचे स्पष्टीकरण शिक्षकाने दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. गट शिक्षणाधिकारी तभाणे यांनी कोरोनामुळे अनेक कर्मचारी क्वॉरंटाइन होते. त्यामुळे प्रस्तावांची तपासणी करता आली नाही. चूक झाली माफी मिळावी, असे स्पष्टीकरणात नमूद केल्याची माहिती आहे.

राजकीय दबावाचा वापर
प्रकरण दडविण्यासाठी राजकीय दबावाचा वापर होत असल्याची चर्चा आहे. प्रकरणाशी संबंधित काहींनी राजकीय नेत्यांशी संपर्क साधला. त्यांच्या माध्यमातून प्रकरण निकाली काढण्यासाठी प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी… BMC साठी २२७ वॉर्डमधील उमेदवारांची लाँग लिस्ट; कोण कुठून मैदानात? पाहा एका क्लिकवर

ONGC Gas Leak: आंध्र प्रदेशात ‘ONGC’ची गॅस गळती! अनेक ठिकाणी लागली आग

दीपिकाला रणबीरला गिफ्ट द्यायचं होतं 'कंडोमचं पाकीट', पण दुसरीकडे रोमान्स करताना अभिनेत्रीनं रंगेहात पकडले आणि...

Pune News : बावधनमधील विवा हॉल मार्क सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला!

Nashik Cyber Fraud : सावधान नाशिककर! वर्षभरात सायबर भामट्यांनी मारला ५७ कोटींवर डल्ला; शेअर मार्केटच्या नावाने सर्वाधिक लूट

SCROLL FOR NEXT