{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1613751474372,"A":[{"A?":"I","A":54,"B":755.1655528654005,"D":150.83444713459951,"C":48.868358625651865,"a":{"B":{"A":{"A":"MAEV6fUobl0","B":1},"B":{"A":7.10542 
नागपूर

वाढत्या कोरोनामुळे शिक्षण मंडळाचे वाढणार टेन्शन; बोर्डाच्या परीक्षांवर विघ्न येण्याची शक्यता

मंगेश गोमासे

नागपूर : राज्यात दोन दिवसांपूर्वी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले. मात्र, कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकड्यांनी दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या शिक्षण क्षेत्रासमोर पुन्हा संकट उभे केले. यामुळे पुन्हा एकदा या परीक्षांवर कोरोनाचे विघ्न येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या विषयांवर आता अधिकाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर यंदा प्रथमच परीक्षा फेब्रुवारी-मार्चऐवजी एप्रिल-मे या कालावधीत होणार आहे. बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होणार आहे. मात्र, मागील आठ दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. 

शिक्षण मंडळाच्या परीक्षांना अजून दोन महिन्यांचा कालावधी असला तरी कोरोना रुग्णांच्या संख्येत अशी वाढ असल्यास लेखी परीक्षा घेणे कठीण होणार आहे. मागील वर्षी कोरोना व टाळेबंदीमुळे बारावी व दहावी परीक्षांच्या निकालाला बराच उशीर झाला. टाळेबंदीमुळे १० महिन्यांपेक्षा अधिक काळ शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. 

परिणामी २०२१ मधील परीक्षा एप्रिल-मे या कालावधीत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आता पुन्हा एकदा चिंता निर्माण झाल्याचे दिसून येते. त्याबाबत शिक्षण मंडळातील एका बड्या अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi News: विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राजकारण तापलं! राहुल गांधींनी सरकारला घेरलं; ठेवल्या तीन ठोस मागण्या, पण कोणत्या?

New Cricket Rules: मुद्दाम नो-बॉल टाकला, तर बॉलर मॅचमधून बाहेर! BCCI लागू करणार असलेल्या नव्या नियमांबद्दल घ्या जाणून

शरद पवार पंतप्रधान मोदींना का भेटले? अखेर कारण आलं समोर; दोन पानी पत्रात नेमकं काय लिहिलंय?

Japanese Eating Habit: २० टक्के पोट रिकामे ठेवून दीर्घायुष्य? काय आहे जपानची 'हारा हाची बू' पद्धत ?

Donald Trump Tariff: ट्रम्प यांचा नवा ‘टॅरिफ बॉम्ब’! जेनेरिक औषधांवर २०० टक्के टॅरिफ; भारतावर मोठा परिणाम?

SCROLL FOR NEXT