नागपूर

कोरोना झाला की सर्व संपले असे नाही; रुग्णालयाचा अट्टाहास सोडा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाचे (coronavirus) रौद्ररूप साऱ्यांनाच धडकी भरवणारे ठरले. जीव वाचवायचा असेल तर रुग्णालयाशिवाय पर्याय नाही, अशीच अनेकांची धारणा झाली आहे. परंतु, शहरातील बोदडे कुटुंबाने (Bodde family) आततायीपणा टाळला आहे. आवश्‍यक सावधगिरी बाळगत घरीच उपचार घेत कोरोनावर यशस्वी मात केली. रुग्णालयाचा अट्टाहास सोडा, प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक विचार, सकस आहार, नियमित व्यायाम व औषधोपचाराच्या बळावर सहजतेने कोरोनावर मात करणे शक्य असल्याचे या कुटुंबाने दाखवून दिले. (bodde family said Corona doesnt mean its all over)

त्रिमूर्तीनगरात राहणारे आशीष बोदडे ग्राफिक डिझायनर असून ॲडव्हरटायझिंग एजंसी चालवितात. मुलगी सेजल अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षाला; तर मुलगा आयुष इयत्ता ९ वीचा विद्यार्थी आहे. पत्नी संगीता व मुलीला प्रथम सर्दीसह ताप आला. कुटुंब कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करीत होते. ताप असल्याने तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यांनी चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला.

चौघांनीही चाचणी केली असता सर्वच पॉझिटिव्ह आले. एका क्षणी ते हादरले खरे; पण पूर्वीपासूनची मनाची तयारी असल्याने न घाबरता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेण्याचे निश्चित केले. मनावर कुठलेही दडपण येऊ दिले नाही. डॉ. अनिरुद्ध मुरार यांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू ठेवले. आपसात सतत सकारात्मक विषयावर चर्चा सुरू ठेवली.

फोन करायचा झालाच; तर मनाने पॉझिटिव्ह असणाऱ्यांसोबतच बोलले. सलग दोन आठवडे औषधासह प्राणायाम, प्रोटीनयुक्त आहार, भरपूर पाणी प्यायचे ही दिनचर्या ठरलेली. नातेवाईक, मित्र, परिचितांनीही मनोबल ढळू दिले नाही. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून कोरोनावर यशस्वी मात करता आल्याचे बोदडे कुटुंबीय सांगतात.

डॉक्टरांवर विश्‍वास ठेवा

कोरोना झाला की सर्व संपलेच, रुग्णालयाशिवाय पर्याय नाही, असा अनेकांचा समज झाला आहे. त्यातूनच कोरोना होताच रुग्णालयात दाखल करून घेण्याची लगबग सुरू होते. पण, हा आततायीपणा रुग्णाला कुटुंबाबासून दूर राहण्यास कारणीभूत ठरतो. धास्ती किंवा भीती हेच कोरोना रुग्णासाठी शत्रू आहेत. त्यापासून लांब राहायचे असेल तर रुग्णालयाचा अट्टाहास सोडायला हवा. अर्थात अगदीच गरज असेल तेव्हाच रुग्णालयात जा, उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर विश्वास कायम ठेवा, असा सल्ला आशीष बोदडे देतात.

(bodde family said Corona doesnt mean its all over)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket Team : जिंकलेत आयर्लंडविरूद्ध अन् म्हणे पाकिस्तान जगातील सर्वोत्तम संघ... PCB च्या नक्वींनी कळसच गाठला

Pune Traffic : मेट्रोच्या कामामुळे सिमला ऑफिस चौकाजवळ वाहतुकीत बदल

PM Modi Mumbai roadshow : ''जुने रेकॉर्ड तोडणार'' मोदींच्या मुंबईतील 'रोड शो'ला तुफान प्रतिसाद; पंतप्रधान म्हणाले...

IPL 2024 RR vs PBKS Live Score: राजस्थानचा सलग चौथा पराभव! कर्णधार सॅम करनच्या संयमी खेळीनं पंजाबला मिळवून दिला विजय

Pune Crime News : महादेव ॲपद्वारे ऑनलाइन सट्टा चालविणाऱ्या कॉल सेंटरवर छापा

SCROLL FOR NEXT