Bodhi Ramteke selected for Summer School in Italy
Bodhi Ramteke selected for Summer School in Italy 
नागपूर

इटली येथे होणाऱ्या समर स्कूलसाठी बोधी रामटेके यांची निवड

सकाळ वृत्तसेवा

चामोर्शी - युनिव्हर्सिटी ऑफ ट्युरीन, इटली येथे ४ ते ८ जुलै २०२२ रोजी आयाेजित जागतिक स्तरावरील समर स्कूलसाठी गडचिरोली जिल्ह्यातील अॅड. बोधी रामटेके यांची निवड झाली आहे. भारतातील आदिवासी समाजाचे प्रश्न व रचनात्मक कायदेशीर काम या विषयी बोधी रामटेके प्रकाश टाकतील.

चारदिवसीय जागतिक विचारमंथनात आदिवासी हक्क, त्यांची लोकशाही मूल्यांवर आधारीत सामाजिक व न्यायिक स्वतंत्र व्यवस्था, आदिवासी संस्कृती-कला, अशा अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. जगातील नामांकित लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स, युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स, युनिव्हर्सिटी ऑफ अँमस्टरडम, स्टॉकहोम्स युनिव्हर्सिटी येथील मान्यवर मागदर्शक म्हणून उपस्थित असतील.

जगभरातील विद्यार्थी व तज्ज्ञ यात उपस्थित असतील. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील बोधी रामटेके यांची निवड होणे ही अत्यंत भूषणावह बाब आहे. दुर्गम भागातील आदिवासी समाजाचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी संविधानिक उपाययोजनांचा वापर करत पाथ फाउंडेशन ३ वर्षापासून कार्यरत आहे. या विधायक कामात अजून गती आणण्यासाठी या समर स्कूलमधील विचारमंथनाचा फायदा होईल, असे अॅड. बोधी रामटेके यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT