The body of the youth was found seven days later Nagpur crime news 
नागपूर

सात दिवसांनंतर मिळाला युवकाचा मृतदेह; आई-वडिलांची चौकशीची मागणी

विजय वानखेडे

वाडी (जि. नागपूर) : लाव्हा येथील एक युवक मागील सात दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्याच्या घरच्या मंडळीसह गावात चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र, त्याचा मृतदेह लावा-फेटरी मार्गावरील एका विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली.

लावा गावातील युवक मनोज सुरेश भोयर (वय २७) हा १७ मार्चला सायंकाळी संतोषीनगर येथून मित्रांसोबत बाहेर फिरायला होता. मात्र, रात्र उलटूनही तो घरी परतला नाही. सकाळी घरच्या सदस्यांनी सर्व ठिकाणी शोध घेतला, पण तो आढळून आला नाही. शेवटी तो बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी १८ मार्चला दाखल केली. शोध सुरूच ठेवला.

तो व्यंकटेश मार्केट या कंपनीत नोकरी करीत होता. एका गुरख्याने एक मृतदेह विहिरीत पडलेला असल्याचे सांगितले. गावातील विनोद लोखंडे, युवकाचे नातेवाईक हरी सलोटे, ग्राम पंंचायत सदस्य पांडुरंग बोरकर आदींनी जाऊन विहिरीचे निरीक्षण केल्यावर यात सत्यता दिसून आल्यावर वाडी पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. मृतदेह पाण्यात सडलेल्या स्थितीत होता. कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्याच्या अंगावर जखम व मारहाणीचे चिन्ह आढळल्याने उपस्थितांनी आत्महत्येबाबत शंका उपस्थित केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूरला पाठविला. मात्र, या प्रकरणात मृत मनोजच्या आई-वडिलांनी मुलाची आत्महत्या नसून त्याची नियोजनबद्ध पद्धतीने हत्या केल्याची शंका व्यक्त करून कार्यवाहीची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Suvendu Adhikari? : एकेकाळी ममता बॅनर्जींचे निकटवर्ती ते आता पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री! कोण आहेत सुवेंदू अधिकारी? काँग्रेसमधून केलेली राजकारणाला सुरुवात

Pune News : रघुनाथ येमूल यांची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता; ‘नाना गायकवाड’ प्रकरणातील सर्व आरोप रद्द

Latest Marathi News Live Update : पश्चिम बंगाल भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी, सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी कोलकाता येथील लोक भवनात दाखल

DC vs KKR Live: लोकेश राहुलची ऐतिहासिक कामगिरी! IPL मध्ये असा पराक्रम केला, जो आतापर्यंत एकालाही नव्हता जमला...

Thalapathy Vijay Government : तमिळनाडूत 'थलपती'चा ऐतिहासिक 'विजय'! बहुमताचा गाठला जादूई आकडा, उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; 'द्रविडी' राजकारणात नवा अध्याय

SCROLL FOR NEXT