Boiled money in the name of Witchcraft in Nagpur 
नागपूर

भयंकर प्रकार : भूतबाधा दूर करण्याच्या नावावर उकळले पैसे; 'अंनिस'च्या तक्रारीवरून कारवाई

योगेश बरवड

नागपूर : भुताटकीचा धाक दाखवून बाधा दूर करण्याच्या नावाखाली आजारी मुलाच्या आईकडून पैसे उकळणाऱ्या तांत्रिक महिलेला एमआयडीसी पोलिसांना अटक केली. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

शबाना सौदागर (रा. वानाडोंगरी) असे तांत्रिक महिलेचा नाव आहे. माया फुलमाळी (६०, रा. दीपकनगर, गिट्टीखदान) या पेन्शनर असून स्वयंपाकाच्या कामालाही जातात. त्या मुलगा नितीन, सून आम्रपाली व तीन वर्षीय नाती दीक्षासोबत राहतात. नितीनची प्रकृती नेहमीच अस्वस्थ असते. माया यांच्या विहीनबाईंनी शबानाकडे नेऊन नितीनवर उपचाराचा सल्ला दिला होता. ती जडीबुटी देऊन उपचार करीत असल्याचेही सांगितले होते.

त्यानुसार माया या तिच्याकडे गेल्या. मुलाच्या प्रकृतीबाबत सांगून उपाय करण्याची विनंती केली. तिने चमत्कारिक रित्या हातावर घर आखून भूतबाधा असे लिहिले. या चमत्कारावर माया यांचा विश्वास बसला. भूतबाधा दूर करण्यासाठी चार हजारांची मागणी केली. त्यानंतर राख व उर्दूत काहीतरी लिहिलेली चिठ्ठी टाकून पाणी प्यायला दिले. यानंतर ती वेळोवेळी पैशांची मागणी करीत राहिली.

घरात गुप्त धन असल्याचे सांगून ते मिळवू देण्यासाठी पुन्हा २५ हजारांची मागणी केली. पैसे देऊनही काहीच उपयोग होत नसल्याने फसवणूक झाल्याचे माया यांच्या लक्षात आले. त्यांनी अंनिसच्या कार्यकर्त्यांना झालेली हकिकत सांगितली. ते त्यांना सोबत घेऊन एमआयडीसी ठाण्यात गेले. पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदवून घेत शबाना राहत असलेल्या घरावर छापा टाकला. तिथून शबानाला ताब्यात घेण्यात आले.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bailgada Sharyat: वेग, ताकद अन् जिद्दीला अखेरचा निरोप! पुणे जिल्ह्यात दबदबा असलेल्या ओम्या बैलाचं निधन

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune Traffic Issue : वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती; ‘रिअल टाइम डेटा’नुसार होणार अभ्यास

SCROLL FOR NEXT