नागपूर : नागपूर एस.टी.स्थानकावर गोंदियातून आलेल्या बसमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचे निनावी पत्र सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास सापडल्याने स्थानकावर खळबळ उडाली.
प्रशासनाने ही माहिती गणेशपेठ पोलिसांना देताच, त्यांनी बॉम्बशोध व नाशक पथकासह पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, तपासणी केली. दरम्यान काहीही न आढळल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास नागपूर एसटी स्थानकावर गोंदिया आगारातून एमएच-३१-एन-८५०१ या क्रमांकाची बस आली. यावेळी ती परत जाण्यासाठी प्रवासी आत चढले.
त्यावेळी एका प्रवाशाला एका सिटवर चिठ्ठी आढळली. त्यात एसटीमध्ये बॉम्ब फुटणार असल्याचे लिहिलले आढळले. त्याने ही चिठ्ठी चालकाला दिली. त्याने ही माहिती अधिकाऱ्यांना दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मछीद्र पंडित यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बॉम्ब शोध व नाशक पथक, श्वान पथकाने बसची तपासणी केली.
मात्र, काही अाढळले नाही. परिसराचीही तपासणी केली. त्यानंतर बस रवाना करण्यात आली. यापूर्वी गडचिरोली आगारातून आलेल्या बसमध्ये एक टिफिन बॉम्ब असल्याचे आढळून आले होते. मात्र, तपासणीत ते फायर इस्टिंग्युशन असल्याचे समोर आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.