Bone fracture in husband & wife's squabble 
नागपूर

टीव्हीचा आवाज मोठा केल्याने पतीने केले भांडण; संतप्त पत्नीने माहेरी केला फोन अन्‌ घडले अघटित...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : हनिफचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले. मात्र, त्याचा पत्नीसोबत सतत वाद होत होता. याच वादातून तो पत्नीला मारहाणही करीत होता. क्षुल्लक क्षुल्लक कारणावरून होत असलेल्या मारहाणीमुळे पत्नी वैतागली होती. ती नेहमी पतीला न मारण्याची विनवनी करीत होती. मात्र, याचा पतीवर काहीही परिणाम होत नव्हता. सततच्या मारहाणीला कंटाळलेल्या पत्नीने माहेरी फोन करून भावंडांना बोलावून घेतले. घरी आलेल्या भावंडांनी भांडण केल्याने पुढील घटनाक्रम घडला... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख आरीफ शेख हनिफ (35, रा. दसरा रोड, कोतवाली) याचे पत्नीसोबत नेहमी घरगुती कारणावरून भांडण होत होते. भांडण झाल्यानंतर तो पत्नीला मारहाण करीत होता. यामुळे पत्नी त्याला भीत होती. मंगळवारीही पती-पत्नीमध्ये भांडण झाले. चिडलेल्या पत्नीने थेट माहेरी फोन केला. तसेच भावंडांना माहिती देत घरी बोलावून घेतले. यावेळी तिच्या माहेरून परवेश शेख उर्फ टिकू कलीम शेख (25), फैजल शेख कलीम शेख (22) आणि कलीम शेख अकबर शेख (52) सर्व रा. गणेश मंदिर जवळ, भवानी मंदिर, पारडी ही सर्व मंडळी शेख आरीफ याच्या घरी दाखल झाली.

यानंतर पत्नीने पतीसोबत का भांडण झाले याची सविस्तर माहिती दिली. कारण ऐकताच माहेरून आलेल्या मंडळींचा पारा चढला. तिघांनीही पत्नीच्या सांगण्यावरून आरीफ याच्यासोबत भांडण करून हल्ला चढविला. त्याला लाथाबुक्कीने मारहाण करून खाली पाडले. तसेच मारहाण सुरूच ठेवली. या मारहाणीमुळे परिसरात एकच खळबळ माजली. शेख आरीफ यानी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांवर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. 

मोडले छातीचे हाड

पती नेहमी मारहाण करीत असल्याने संतापलेल्या पत्नीने माहेरी फोन करून भावंडांना घरी बोलावून घेतले. माहेरची मंडळीही काय झाले आणि आणि काय नाही याचा विचार करीत घरी दाखल झाले. यानंतर दोघांना आमोरा-समोर बसवून भांडणाचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी जे कारण पुढे आले त्यावरून चिडलेल्या माहेरच्या मंडळींनी आरीफला मारहाण करायला सुरुवात केली. आरीफला खाली पाडून मारहाण केल्याने त्याच्या छातीचे हाड मोडल्या गेले. आरीफवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

माहेरी फोन करून तिघांना घेतले बोलावून

कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारा शेख आरीफ शेख हनिफ मंगळवारी सकाळी घरी होता. पत्नीने टीव्ही पाहण्यासाठी सुरू केला तसेच आवाज मोठा केला. आवाज मोठा केल्याने शेख आरीफ याने पत्नीला रागावले. मात्र, पत्नीने आवाज काही कमी केला नाही. त्यामुळे आरीफचा पारा चढला. त्याने पत्नीला मारहाण केली. चिडलेल्या पत्नीने माहेरी फोन करून तिघांना बोलावून घेतले. यानंतर झालेल्या भांडणातून आरीफच्या छातीचे हाड मोडले गेले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khambatki Ghat Traffic : ऐन दिवाळीत खंबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी; वाहनचालक हैराण, सातारा-पुणे महामार्गावर लांबलचक रांगा

VIDEO : गरीब रथ एक्सप्रेसला भीषण आग, अनेक प्रवासी जखमी; सकाळी ७ वाजता घडली दुर्घटना

संदर्भ पत्र का दिले नाही? जातीयवादाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर प्राचार्यांनी केला खुलासा

Diwali Muhurat Trading 2025: मुहूर्त ट्रेडिंग संध्याकाळी नाही तर 'या' वेळी होणार; का बदलली वेळ?

Latest Marathi News Live Update : गरीब रथ एक्सप्रेसला भीषण आग

SCROLL FOR NEXT