नागपूर

मेलेला, तरंगत असलेला बेडूक काढण्यासाठी विहिरीत उतरला अन्...

सकाळ वृत्तसेवा

पांढरी (जि. गोंदिया) : घरासमोरील अंगणात असलेल्या विहिरीतील विषारी वायू गळतीमुळे दोन युवकांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना जवळच्या घटेगाव येथे घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. कुर्मराज हिरालाल कोसलकर (वय २८) व संघपाल दुर्योधन पंचभाई (वय ३३) दोघेही रा. घटेगाव अशी मृतांची नावे आहेत.

कुर्मराज कोसलकर हा शनिवारी दुपारी विहिरीत मेलेला आणि तरंगत असलेला बेडूक काढण्यासाठी विहिरीत उतरत होता. मात्र, मधेच श्वास गुदमरल्याने तो विहिरीत पडला. जवळच उभ्या असलेल्या कुर्मराजच्या पत्नीने पती विहिरीत पडताच हंबरडा फोडला. त्यामुळे घराशेजारीच असलेला संघपाल पंचभाई हा मदतीला धावून आला. तोही विहिरीत उतरूला.

परंतु, विषारी वायूमुळे श्वास गुदमरून तोदेखील विहिरीत पडला. यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात व परिसरात पसरली. पाहता पाहता हजारोच्या संख्येत नागरिकांनी गर्दी केली. स्थानिकांनी घटनेची माहिती डुग्गीपार पोलिसांना दिली. काही वेळेत तालुका व पोलिस प्रशासनाने घटनास्थळ गाठले.

विहिरीमध्ये काय आहे, म्हणून पेटता दिवा टाकण्यात आला. परंतु, काही अंतरावर जाऊन विहिरीमध्ये दिवा विझला. त्यामुळे विहिरीत विषारी वायू असल्याचे समजले. दोघांचेही मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी सडक अर्जुनीच्या आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

कुर्मराजचे याच वर्षी झाले लग्न

कुर्मराज कोसलकर हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. याच वर्षी मे महिन्यात त्याचे लग्न झाले होते. त्याच्या मृत्यूमुळे नवविवाहित पत्नी व परिवारावर मोठे संकट कोसळलेले आहे.

बहिणींना अश्रू अनावर

बहीण-भावाचे अतूट नाते असणाऱ्या रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली. त्यामुळे दोन्ही कुटुंबांतील बहिणी भावाच्या जाण्याने धाय मोकलून रडत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT