file 
नागपूर

वडीलांनी आईला शिवीगाळ केल्यावरून संतापलेल्या मुलाने केले भयानक कृत्य

सकाळ वृत्तसेवा

काटोल़ (जि.नागपूर) : बापाला दारूचे व्यसन. दारू पिउन आल्यानंतर घरातील वातावरण बिघडायचे. घरातील सगळ्यांना शिवीगाळ करणे, मोठमोठ्याने भांडण करणे नित्याचेच झाले होते. रविवारी वडील असेच दारू पिऊन धिंगाणा घालू लागले.  मद्यपी बापाने आईला शिवीगाळ केल्याने राग अनावर झालेल्या मुलाने थेट कुऱ्हाडीचे घाव घालत बापाची हत्या केल्याची खळबळजनक घटना स्थानिक पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या येनवा येथे रविवारी रात्री घडली़.

मुलाने केला वडिलांना समजविण्याचा प्रयत्न
संदीप प्रकाश बागडे व पुष्पा प्रकाश बागडे दोघेही (येनवा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी मायलेकांची नावे आहेत. प्रकाश बागडे असे मृताचे नाव आहे. प्रकाश बागडे याला दारूचे व्यसन होते. तो नेहमी दारू पिऊन घरी भांडण करायचा. घटनेच्या दिवशी रविवारी रात्री मद्य प्राशन करून घरी आला़. पत्नीसोबत भांडायला सुरुवात केली. भांडण कशाला करता म्हणून मुलाने हटकले. प्रकाशाने पुन्हा पत्नीला व मुलाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली़. मुलाने वडिलांना समजविण्याचा प्रयत्न केला़. मात्र, वडील ऐकत नसल्याने मुलाचा राग अनावर झाला. त्याने घरातून कुऱ्हाड आणून वडिलांच्या डोक्यात मारली. यात वडिलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला़.

घरावरून पडल्याचा बनाव
मुलाने गावातील पोलिस पाटलाचे घर गाठले. घरावरून पडल्याने वडिलांचा मृत्यू झाल्याचे सांगून त्यांना घरी बोलावले. परंतु, पोलिस पाटलांना शंका आली. त्यांनी काटोल पोलिसांना माहिती दिली़. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दोघांविरोधात गुन्हा नोंद करून अटक केली. पोलिस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक राहुल बोंद्रे व सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी वानखेडे तपास करीत आहेत.

संपादनः विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

District Bank election:चुकीचे लोक नकोत, म्हणून स्वाभिमान बाजूला ;डॉ. सुजय विखे पाटील ; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Marathi News Live Updates: आंबेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर धडक कारवाई; सात हायवा जप्त

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT