Boys and girls damage the Congress leaders car in Nagpur 
नागपूर

तरुणाईचा उन्माद; दारू पिऊन नशेत धूत असलेल्या मुला-मुलींनी काँग्रेस नेत्याची कार फोडली

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : दारू पिऊन नशेत धूत असलेल्या पाच मुला-मुलींनी शहर कॉंग्रेसचे महासचिव व प्रवक्ते संदेश सिंगलकर यांच्या कारची तोडफोड केली. या तरुणांचे हे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. सिंगलकर यांच्या तक्रारीवरून सिताबर्डी पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

धरमपेठ खरे टाऊन येथे लाड अपार्टमेंटपुढे रस्त्याचे काम सुरू असल्याने संदेश सिंगलकर यांनी त्यांची एमएच ३१, डीव्ही १८८६ क्रमांकाची इनोव्हा कार बुधवारी सायंकाळी आदित्य हॉटेलच्या कॉर्नरला उभी केली होती. बुधवारी रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास दोन मुली व तीन मुलांनी कारवर दगडफेक केली अन् पळ काढला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्ण घटनाक्रम कैद झाल्याचे संदेश सिंगलकर यांनी सांगितले. याप्रकरणी सिताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. धरमपेठेत तरुणांचा उन्माद नेहमीच दिसून येत आहे. या भागात मुले, मुली नेहमीच हैदोस घालत असतात. या भागात पोलिसांंनी गस्त घालण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Satej Patil Friendship: मंत्री मुश्रीफांचा फोन, सतेज पाटील यांची साथ; बाहूरन विरोध आतून मदत, गोकुळची राजकीय पेरणी

Stock Market Today: युद्धातही शेअर बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 450 अंकांनी वाढला; कोणते सेक्टर तेजीत?

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

SCROLL FOR NEXT