Brother kills brother over family dispute crime nagpur police Sakal
नागपूर

Nagpur Crime : धक्कादायक! तापट स्वभावामुळे नेहमीच करायचा भांडण...अखेर त्याने भांडणादरम्यान भावाचा केला खून

Nagpur Latest News : आत्महत्येचा बनाव ः शवविच्छेदनानंतर मोठ्या भावावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : भांडणादरम्यान भावाचा गळा दाबून खून केल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच एकाने जरीपटका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ताफ्यासह जाऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविल्यावर मोठ्या भावाने खुनाची कबुली दिल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भावास अटक केली.

प्रणय ऊर्फ बंटी श्रीराम गौर (वय ३४ रा.कुशीनगर) असे मृताचे नाव असून प्रभात श्रीराम गौर (वय ३६) असे आरोपी मोठ्या भावाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंटी हा मोबाइल शॉपीत काम करायचा. शनिवारी दुपारच्या सुमारास बंटीचा छोटा भाऊ सुशांत श्रीराम गौर (वय ३२) याच्याकडे प्रॉपर्टीच्या संदर्भात भेटण्यासाठी काही मित्र आले.

त्यांनी प्रॉपर्टी बघायची असल्यास उद्या वाहन पाठवितो असे सांगून जाऊ लागले. इतक्यात बंटी तिथे आला. त्यावेळी सुशांत मित्राला बघून घेतो असे बोलला. बंटीला तो आपल्याला उद्देशून म्हणत असल्याचे वाटल्याने त्याने सुशांतशी वाद घातला.

यानंतर त्याने घरातील किचनमधून चाकू आणून त्याला मारण्यासाठी धावला. त्यामुळे तो पळू लागला. इतक्यात मोठा भाऊ आणि त्याची आई मीरा श्रीराम गौर (वय ६०) यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला.

मात्र, सुशांतला मारण्याच्या नादात घरातील टीव्ही फोडला आणि कपाटाचे काचही फोडून टाकले. त्यामुळे त्याला थांबविताना खाली पाडून प्रभातने त्याचा गळा दाबला आणि आईने त्याचे पाय धरून ठेवले. यामुळे बंटी बेशुद्ध पडला. त्याला उपचारासाठी सुरुवातीला नजीकच्या रुग्णालयात आणि त्यानंतर मेयो रुग्णालयात नेले.

मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. त्यामुळे त्याला घरी आणून त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू करण्यात आली. मात्र, इतक्यात परिसरातील एका नागरिकाने जरीपटका पोलिसांना त्याचा खून झाला असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जरीपटका पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला.

पोलिसांनी पिंटूचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयोमध्ये पाठवीत, याप्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. यादरम्यान प्रभात गौर याने पोलिसांना त्याचा खून केल्याची माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी त्याच्याविरोधात ३०२, ३४ कलमांसह गुन्हा दाखल करीत प्रभातला अटक केली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

तापट स्वभावामुळे नेहमीच करायचा भांडण

बंटी हा तापट स्वभावाचा होता. त्यामुळे त्याच्या स्वभावामुळे घरचे त्रस्त होते. तो नेहमीच घरच्यांशी कुठल्या ना कुठल्या कारणाने भावांशी वाद घालायचा. विशेष म्हणजे, प्रभात याचे दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. त्याच्या लग्नात टीव्ही आणि आलमारी सासरच्या मंडळीकडून आली होती. रागाच्या भारात बंटीने ती फोडली. त्यामुळे प्रभातला राग अनावर झाला. त्याने त्याला खाली पाडून त्याचा गळा दाबून खून केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शुक्रवारी लग्न, मंगळवारी पुन्हा तुरुंगात जावं लागणार! माजी खासदाराच्या ५२ वर्षीय लेकाला सुप्रीम कोर्टाचा दणका

Latest Marathi News Updates : श्रेय दुसऱ्या कोणाचं नाही तर गरीब मराठ्यांचा आहे - मनोज जरांगे

Ganesh Visarjan 2025: 'काेल्हापूरमध्ये विसर्जन मिरवणुकीतही साउंडमुळे कानठळ्‍या'; शहरातील ४१ मंडळांवर खटले : पदाधिकारी, सिस्टीम मालकांना प्रकरण भोवणार

Asia Cup 2025 मध्ये अर्शदीप सिंग घडवणार इतिहास, आजपर्यंत कोणत्याच भारतीयाला न जमलेला करणार पराक्रम

श्रेयस अय्यर IN, जसप्रीत बुमराह OUT! सर्फराज खानचे पुनरागमन; वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असा असेल संघ

SCROLL FOR NEXT