pune crime
pune crime 
नागपूर

नागपूर | लग्नातच वधुच्या भावाला चाकुने भोसकलं, गाणी लावण्यावरून वाद आला जीवाशी

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : लग्नाच्या स्वागत समारंभात आलेल्या तरुणांनी संगीत बंद केल्यावरून शिवीगाळ करीत वाद घातला. त्यांना समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या वराचा मित्र आणि वधूच्या भावाला मारहाण करून चाकूने हल्ला केला. एकाच्या पोटात चाकूने भोसकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना कपिलनगर पोलिस ठाण्यांतर्गत खसाळा परिसरात घडली. (Nagpur Crime News)

अभिषेक तुकाराम इंगोले (वय २४) असे जखमी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी अभिषेकचा भाऊ सूरज इंगोले (वय २८)च्या तक्रारीवरून अल्पवयीनसह चार आरोपींवर गुन्हा नोंदवला आहे. पारस शिवराज बिटले (वय २१), सागर शंकर शेंडे (वय २०), रत्नदीप बागडे (वय २१) अशी आरोपींची नावे असून सगळे त्रिमूर्ती चौक, अमरनगर, हिंगणा रोड येथे राहणारे आहेत.

सूरजचा मित्र अश्विन तभाणेचे शनिवारी लग्न झाले. रविवारी रात्री घरासमोरच स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यात वधूकडील पाहुणेही आले होते. घरच्या स्पिकरवर गाणी वाजत होती. गाण्यांच्या तालावर सर्व तल्लीन होऊन नाचत होते. यावेळी दारूच्या नशेत असलेल्या आरोपींनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. यामुळे गाणी बंद करण्यात आली. आरोपी चिडले. त्यांनी शिवीगाळ करीत वाद घातला.

बादल कोहळे नावाच्या तरुणाला आरोपींनी मारहाण सुरू केली. अभिषेकने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी बादलला सोडून त्याच्याशीच वाद घातला. चाकू काढून त्याच्या पोटात भोसकला. वधूचा भाऊ तेजन याने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावरही चाकूने वार केला आणि फरार झाले. अभिषेक आणि तेजसला उपचारार्थ मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कपिलनगर पोलीस घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवून दोन आरोपींना अटक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT