Paper Writing sakal
नागपूर

Writing Paper : सहा तास पेपर लिहिण्याची शिक्षा; एकाच दिवशी दोन पेपर

बीएस्सी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष.

केवल जीवनतारे ः @kewalsakal

नागपूर - येत्या ३ जुलैपासून बीएस्सी नर्सिंगच्या चौथ्या सत्राची परीक्षा सुरू होणार आहे. मात्र तिसऱ्या सत्रात एक किंवा दोन विषय राहून गेल्यानंतर एटीकेटीधारक विद्यार्थ्यांसाठी चौथ्या सत्राचे पेपर देणे म्हणजे अग्निदिव्यच. एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना तिसऱ्या आणि चौथ्या सत्रातील दोन्ही पेपर एकाच दिवशी द्यावे लागतील.

सकाळपासून सायंकाळपर्यंत तब्बल ६ तास पेपर लिहावा लागेल. यामुळे एटीकेटीधारक विद्यार्थी तणावात आहेत. महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने हा घोळ केला असून, सहा तास लिखाण करताना विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य समस्या उद्‍भवल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न पालक वर्गाने उपस्थित केला.

आरोग्य विद्यापीठाचे बीएस्सी नर्सिंगचे पूर्वी चार वर्षे चार सत्र होते. परंतु अलीकडे चार वर्षात ८ सत्रात परीक्षा होते. त्यात अभ्यासक्रमापेक्षा असाइन्मेंट जास्त असतात. मात्र, विद्यार्थ्यांनी ८ सत्रात परीक्षा आणि असाइन्मेंट देण्यासाठी मन तयार केले.

परंतु यावर्षी एकाच दिवशी तिसऱ्या आणि चौथ्या सत्रातील पेपर विद्यार्थ्यांना देण्याचे वेळापत्रक तयार करणे म्हणजे एकप्रकारे एटीकेटीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जणू आरोग्य विभागाकडून मिळालेली शिक्षा आहे, अशी चर्चा राज्यातील चार शासकीय तसेच दिडशेवर खासगी बीएस्सी नर्सिंग महाविद्यालयांमध्ये आहे. यासंदर्भात आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा विभागाशी संपर्क साधला; परंतु तो होऊ शकला नाही.

६ तास कसे बसायचे?

१० आणि १२ जुलै रोजी सकाळी १० वाजता पेपर आहे. पेपर सुरू होण्याच्या एक तासापूर्वी परीक्षा केंद्रावर या अशी सूचना आहे. यामुळे ९ वाजता केंद्रावर यावे लागेल. सकाळी १० वाजता सुरू झालेला पेपर १ वाजता सुटेल. वर्गखोल्यातून निघताना विद्यार्थ्यांची किमान १५ मिनिटं बाहेर येण्यात जातील. १ वाजून पंधरा मिनिटांनी बाहेर आलेल्या विद्यार्थ्याला लगेच २ वाजता त्याच सेंटरवर दुसरा पेपर सोडविण्यासाठी जावे लागेल.

दुपारी २ ते ५ या वेळेत तिसऱ्या सत्राचा पेपर एटीकेटीधारक विद्यार्थ्याला सोडवावा लागेल. पंधरा ते वीस मिनिटांत कुठे पाणी पिणार, कुठे जेवण करणार, उपाशीपोटी पुन्हा हा विद्यार्थी पेपर लिहिण्यासाठी केंद्रावर जाईल. यादरम्यान विद्यार्थी भोवळ येऊन पडल्यास, त्याच्या जिवावर बेतणारा प्रसंग आल्यास जबाबदार कोण? अशी विचारणा पालकांकडून होत आहे.

विद्यार्थी तणावात

१० जुलै रोजी सकाळी १० वाजता तिसऱ्या सत्रातील ‘अप्लाईड मायक्रोबायोलॉजी ॲण्ड कंट्रोल इन्क्लुडिंग सेफ्टी’ विषयाचा पेपर आहे. या पेपरची वेळ १ वाजेपर्यंत आहे. दुपारी २ वाजता चौथ्या सत्रातील ‘ऑडिट हेल्थ नर्सिंग’ विषयाचा पेपर आहे. १२ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत चौथ्या सत्रातील ‘फॉरमॅकोलॉजी-२, पॅथॉलॉजी-२ ॲण्ड जेनेसिस’ विषयाचा पेपर आहे.

तर दुपारी २ वाजता ऑडिट हेल्थ नर्सिंग-२ या विषयाचा पेपर आहे. विशेष असे की, बीएस्सी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना तीन तीन विषयांचा एकच पेपर असतो. यामुळे विविध विषयांचा एक पेपर देताना विद्यार्थी प्रचंड तणावात राहतील.

तीन तासांचा पेपर सोडविणे विद्यार्थ्यांना नकोसे वाटते. अवघ्या चार ते सहा महिन्यांनंतर सत्र असल्याने विद्यार्थ्यांना वर्षभर अभ्यासच करावा लागतो. त्यात एकाच दिवशी दोन पेपर देण्याचा परीक्षा विभागाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी योग्य नाही. परीक्षा विभागाच्या अशाच अडेलतट्टू धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होतो. प्रसंगी तणाव सहन न झाल्याने त्यांच्या मनात आत्महत्येच्या विचारांचे काहूर निर्माण होते.

- डॉ. प्रवीण नवखरे, मानसोपचार तज्ज्ञ, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT