buses for madhya pradesh from nagpur cancelled due to corona  
नागपूर

नागपुरातून मध्यप्रदेशला जाणाऱ्या सर्व बसफेऱ्या रद्द, 'एमपी' शासनाच्या निर्देशानुसार निर्णय

योगेश बरवड

नागपूर : कोरोना संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसला मध्यप्रदेशात बंदी घालण्यात आली आहे. मध्यप्रदेश सरकारच्या निर्देशानुसार एसटी महामंडळाने मध्यप्रदेशच्या सर्व फेऱ्या रविवारपासून थांबविल्या आहेत. लॉकडाउनची शक्यता आणि होळी तोंडावर असल्याने गावाकडे परतण्याच्या तयारीत असणाऱ्या मजूरवर्गाला गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. 

नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानक येथून दररोज छिंदवाडा, इंदूर, पचमढी, शिवणी, खमारपाणी, बेरडी, मोहगाव, लोधीखेडा, लालबरला आदी मध्यप्रदेशच्या वेगवेगळ्या मार्गांवर एकूण २८ फेऱ्या सोडण्यात येतात. त्यातील सहा फेऱ्या गणेशपेठ आगारातून सोडण्यात येत असून उर्वरित फेऱ्या अन्य आगारातील बसेसद्वारे होतात. या फेऱ्यांना प्रवासी अधिक असल्याने मिळणारा महसूलही अधिक असतो. यामुळे एसटी प्रशासनाच्या दृष्टीने मध्यप्रदेशच्या फेऱ्या महत्त्वाच्या आहेत. परंतु, रविवारपासून महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना मध्यप्रदेशात प्रवेश नाकारण्यात आला आहे. एसटी महामंडळाने यामार्गावरील फेऱ्या थांबविण्यात आल्याचे यापूर्वीच जाहीर केले असले, तरी अनेकांना त्याबाबत माहिती नाही. यामुळे मध्यप्रदेशात जाण्यासाठी गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावर पोहोचत आहे. 

हैदराबादला काम करणारे मध्यप्रदेशातील मजूर रविवारी सकाळच्या सत्रात सहकुटुंब नागपूर स्थानकावर पोहोचले. मध्यप्रदेशात जाण्यासाठी बसेस नसल्याची माहिती मिळाल्याने त्यांना धक्काच बसला. त्यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे विनवणीही केली. परंतु, मध्यप्रदेशात प्रवेशच नसल्याने अधिकाऱ्यांनीही नाईलाज असल्याचे सांगितले. अखेर चिंताग्रस्त अवस्थेत अन्य पर्यायाच्या शोधात त्यांना बसस्थानक सोडावे लागले. 'गावी जायचेच आहे. सोबत मुलंबाळं असल्याने ट्रक किंवा अन्य पर्यायांचा शोध घ्यावा लागेल', अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ठाकरे बंधू एकटवले! ४ ऑक्टोबरला 'जनमोर्चा'ची घोषणा; नेमका मुद्दा काय?

Virat Kohli Retirement: २०२७ चा वर्ल्ड कप हा माझा भारतासाठी शेवटचा...; विराट कोहलीचे निवृत्तीचे संकेत, रोहित शर्माही म्हणाला की...

Amazon Great Indian Festival sale 2026: स्मार्टफोन्सवर ऑफरचा पाऊस; मिळणार भरघोस डिस्काउंट! पाहा कोणत्या फोनची किंमत किती?

Incognito मध्ये सर्च केल्यावर हिस्ट्री दिसत नाही; पण ‘या’ लोकांना तुमची माहिती कळू शकते

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

SCROLL FOR NEXT