Businessman in nagpur will protest tomorrow against tukaram mundhe
Businessman in nagpur will protest tomorrow against tukaram mundhe  
नागपूर

आयुक्त तुकाराम मुंढेंच्या मनमानी कारभाराविरोधात व्यापारी संघटनांनी उचलले हे टोकाचे पाऊल.. वाचा सविस्तर 

राजेश रामपूरकर

नागपूर:  महानगर पालिका आयुक्तांनी व्यापारी प्रतिष्ठानांना नवा परवाना घेण्याची केलेली सक्तीसह मनमानी कारभाराविरुद्ध शहरातील सर्वच व्यापारी संघटनांनी उद्या बुधवारी (ता. १९) व्यापार बंदची हाक दिली आहे, अशी माहिती आज व्यापारी संघटनाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली. बंदमध्ये नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे, नागपूर चेंबर ऑफ कॉमर्स, अखिल भारतीय व्यापारी महासंघ, चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज ट्रेड (कॅमेट), विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशनचे सदस्य सहभागी होणार आहेत असेही ते म्हणाले.

नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आश्विन मेहडिया म्हणाले, नव्याने घ्यावा लागणारा परवाना सर्व व्यापारी, उद्योग, सेवा पुरवठा करणारे आणि व्यावसायिकांना बंधनकारक करण्यात आला आहे. अर्ज करण्यासाठी महापालिकेला अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग, नगररचना विभाग, झोन प्रमाणपत्र, ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) सक्तीचे केलेले आहे. यामुळे इन्सेक्टर राज आणण्याचा प्रयत्न मनपा आयुक्त करीत आहेत हे यावरून स्पष्ट होत आहे. व्यापारी, उद्योगपती आणि व्यावसायिकांना त्रास देण्याचा हा प्रकार आहे. कोरोनामुळे व्यापारी आर्थिक अडचणीत सापडले असताना आयुक्तांकडून मनमानी कारभार सुरू आहे. हा कायदा भ्रमीत करणारा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भारतीया म्हणाले, शासन निर्भीडपणे व्यवसाय करण्यावर भर देत आहे. भ्रष्टाचार कमी करून इन्स्पेक्टर राज संपविण्यावर भर देत आहे. स्थानिक प्रशासन मात्र, व्यापाऱ्यांना नवनवीन कायदे आणि अटी लादून अडचणीत आणत आहेत. कॅमिटचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल म्हणाले, नागरिकांच्या हितासाठी काम करण्याचे कर्तव्य बजावणारे प्रशासन महामारी अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत विवेकबुद्धीचा अनियंत्रित वापर करीत व्यापाऱ्यांवर दबाव टाकत आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण केली जात आहे. 

सध्याच्या या परिस्थितीत आयुक्त शहराचे नोडल अधिकारी आहे. त्यामुळे त्यांनी या महामारीत व्यापाऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल अधिक संवेदनशील असणे अपेक्षित होते. त्यांनी व्यापार परवानाचे आदेश काढून अडणीत आणले आहे. हा काळा कायदा रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली. मनपा आयुक्तांनी हा कायदा रद्द न केल्यास व्यापारी आंदोलन अधिक तीव्र करतील असा इशाराही त्यांनी दिला. या बंदमध्ये व्यापाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.

एनसीसीएलचे अध्यक्ष विष्णुकुमार पाचेरीवाला म्हणाले, कोरोन विषाणूमुळे व्यापारी आधीच वाईट स्थितीत आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा नवीन कायदा लागू करण्यात येऊ नये. मनपाने लागू केलेल्या या कायद्याबद्दल आमची नाराजी दर्शविण्यासाठी बंदचे आवाहन केले असल्याचे सांगितले. यावेळी व्हिटीएचे अध्यक्ष जे.पी. शर्मा, सचिव तेजिंदरसिंग रेणू, एनव्हीसीसीचे माजी अध्यक्ष हेमंत गांधी, एन्व्हीसीसीचे सचिव रामअवतार तोतला, सचिन पुनियानी उपस्थित होते. हा प्रस्ताव महानगर पालिकेच्या महासभेत मान्य करण्यात येऊ नये म्हणून महापौर संदीप जोशी यांची उद्या बुधवारी (ता.१९) भेट घेणार आहे. त्यांना पुन्हा बंद का पुकारला याबद्दल अवगत करणार आहे. पालकमंत्री नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही निवेदन दिलेले आहे असे मेहाडिया म्हणाले.

बंदला यांचा पाठिंबा

स्टील अँड हार्डवेअर चेंबर ऑफ विदर्भ, नागपूर जनरल मर्चंट्स असोसिएशन, विदर्भ प्लायवूड मर्चंट्स असोसिएशन, नागपूर व्हेईकल ब्रोकर असोसिएशन, विदर्भ ऑप्टिशियन असोसिएशन, विदर्भ डाईज आणि केमिकल्स मर्चंट असोसिएशन, होलसेल क्लॉथ ॲण्ड यार्न मर्चंड असोसिएशन, विदर्भ रुलर इंडस्ट्रीज असोसिएशन, घास बाजार स्टील असोसिएशन, धरमपेठ व्यापारी संघ, नागपूर फटाके विक्रेते संघ, विदर्भ ट्रान्सस्पोर्ट कमिशन एजंट असोसिएशन. स्टोन मर्चंट असोसिएशन, नाग विदर्भ टी मर्चंट असोसिएशन, विदर्भ पेन अँड स्टेशनर्स असोसिएशन, इलेक्ट्रिकल मर्चंट्स असोसिएशन, सेंट्रल इंडिया कोल डीलर्स असोसिएशन, विदर्भ कम्प्युटर ॲण्ड मीडिया डीलर्स वेलफेअर असोसिएशन, कन्झ्युमर प्रॉडक्ट्स डीलर्स असोसिएशन, हार्डवेअर डीलर्स असोसिएशन, होलसेल होजरी आणि रेडीमेड गारमेंट्स मर्चंट्स असोसिएशन, विदर्भ फ्लाय ॲश ब्रिक्स मॅन्युफॅक्चर असोसिएशन, नागपूर नॉनव्हेन बॅग मेकर्स वेलफेयर असोसिएशन, विदर्भ ऑटोमोबाईल्स डीलर्स असोसिएशन, सीताबर्डी व्यापारी संघ, नागपूर मोबाइल आणि मोबाइल अ‍ॅक्सेसरीज होलसेल असोसिएशन, कॅनव्हासिंग एजंट वेलफेयर असोसिएशन, नागपूर सिमेंट असोसिएशन, नागपूर स्टेनलेस स्टील अँड मेटल मर्चंट्स असोसिएशन, नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, नागपूर चिलीज मर्चंट्स वेलफेअर असोसिएशन.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT