By kidnapping Gang rape of a minor girl friends on Facebook sakal
नागपूर

अपहरण करून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

आठवड्यातील दुसरी घटना : फेसबुकवर होते मित्र

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (ता.१०) रात्री अंबाझरी ठाण्यांतर्गत उघडकीस आली. या प्रकरणात पाच ते सहा जणांचा सहभाग असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. तीन दिवसांपूर्वी लावा परिसरातही महिलेच्या घरात घुसून सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अंबाझरी ठाण्यांतर्गत राहते. काही दिवसांपूर्वी तिची फेसबुकवर एका तरुणाशी मैत्री झाली. २ फेब्रुवारीला तरुणाने तिला रविनगर चौकात भेटायला बोलावले. तेथून तिला जाफरनगर येथील एका फ्लॅटमध्ये घेऊन गेला. तिथे दोघांनी पार्टी केली. यानंतर तिच्यावर जबरीने अत्याचार केला. काही वेळाने त्या तरुणाचा एक साथीदार फ्लॅटमध्ये आला. त्यानेही तरुणीवर अत्याचार केला. अशाप्रकारे ५ ते ६ तरुणांनी आळीपाळीने तिचे शोषण केले. यामुळे तरुणी घाबरली होती. गुरुवारी सायंकाळी तिने हिंमत करून अंबाझरी पोलिसात तक्रार केली.

सामूहिक अत्याचाराची माहिती मिळताच डीसीपी विनिता साहू ठाण्यात पोहोचल्या. तरुणीकडून घटनेची पूर्ण माहिती घेतली. याशिवाय पोलिस आयुक्तांनीही भेट देत प्रकरणाची माहिती घेतली. दरम्यान, मुलीचे वय १७ वर्षे ८ महिने असल्याची माहिती असून त्याचीही पडताळणी करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. लवकरच आरोपी ताब्यात असतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून शोध सुरू केला आहे.

अत्याचारापूर्वी घेतली दारू

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यापूर्वी सर्व मित्रांनी दारू पिल्याची माहिती सूत्रांनी दिली. युवकाने अमरावती मार्गावरुन मुलीला बाईकवरून फ्लॅटवर नेले. तिथे मुलगी आणि युवकाने पार्टी केली. त्यानंतर तिच्यावर पाच ते सहा मित्रांनी अत्याचार केल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

Jungle Safari: वाघ-हत्तींच्या सफारीपलीकडे उत्तराखंडची नवी झेप; आता पर्यटकांना दाखवणार ‘हिमालयीन घोस्ट

डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या…' लालबागच्या राजाला अखेरचा निरोप; गर्दीच्या महासागरात शेवटचा दर्शनाचा क्षण

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT