Nagpur Crime News : गुन्ह्याच्या तपासासाठी बोलावले अन पट्ट्याने झोडून काढले Sakal
नागपूर

Nagpur Crime News : गुन्ह्याच्या तपासासाठी बोलावले अन पट्ट्याने झोडून काढले

ठाण्याच्या आवारात पोहोचताच विपुल मुनावत यांनी मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग सुरू केली.

सकाळ वृत्तसेवा

गडचांदूर : मागील गुन्ह्याचा तपास करायचा आहे. त्या संबंधाने बोलावून ठाणेदाराने एकास पट्ट्याने झोडपून काढले. दरम्यान, याप्रकरणाची तक्रार अन्यायग्रस्त युवकाने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

सात जून रोजी संध्याकाळी सात वाजता कोरपनाचे ठाणेदार, वाहतूक पोलिस कर्मचारी, एक महिला पोलिस कर्मचारी तांडा (धानोली) येथे आले. येथील रमेश सिंगटराव मुनावत यांच्या घरी अवैध दारू साठा असल्याच्या संशयावरून त्यांच्या घराची झाडाझडती घेतली.

तेव्हा त्यांची लहान मुलगी उपस्थित होती. त्यादरम्यान रमेश मुनावत यांचे पुतणे विपुल देविदास मुनावत यांनी घरात कुणीही नाही म्हणून सांगितले. तेव्हा ठाणेदाराने शासकीय कामात अडथळा आणू नको असे बजावले.

तपासात घरात काहीच मिळून आले नाही. तेव्हा ठाणेदारांनी मागील गुन्ह्याचा तपास आहे असे सांगून विपुल मुनावत याला ८ जूनला बोलावले. ठाण्याच्या आवारात पोहोचताच विपुल मुनावत यांनी मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग सुरू केली.

ठाणेदारांनी केबिनमध्ये बोलवले. तेव्हा एका शिपायाकडून पट्टा बोलवून घेतला. त्याच पट्ट्याने शिवीगाळ करीत विपुल मुनावत याला मारहाण केली. दवाखान्यात गेल्यास पुन्हा चोप देतो अशी धमकी देऊन गावाला परत पाठविले.

गावकऱ्यांनी विपुल मुनावत यांना दवाखान्यात नेले. या अनुषंगाने झालेल्या प्रकरणाची चौकशी करून ठाणेदार व पोलिस शिपायास तातडीने निलंबित करण्यात यावे अशी मागणी अन्यायग्रस्त व तक्रारदार विपुल मुनावत यांनी केली आहे. तशी तक्रार त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. दरम्यान यार प्रतिक्रियेसाठी संबंधित ठाणेदोराला संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: UPI वरील नवीन चार्जनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? पंप डीलर्सचा सरकारला प्रस्ताव; आज कितीला मिळतंय?

Agniveer Exit Plan : अग्निवीरांसाठी खूशखबर! 4 वर्षांनंतर नोकरीची चिंता मिटणार; सरकारकडून मोठा 'एक्झिट प्लॅन' तयार, जाणून घ्या सविस्तर

Student Drug Prevention: शासनाचा माेठा निर्णय! शालेय समित्‍या होणार ‘नशा’विनाशक; शाळांच्या व्यवस्थापनात मुख्‍य जबाबदारी

Marathi News Live Updates : गणपतीपुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी अखेर वस्त्रसंहिता लागू

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

SCROLL FOR NEXT