anil deshmukh and parinay fuke Sakal
नागपूर

Parinay Fuke : अनिल देशमुख यांचा जामीन रद्द करा, पुरावे असलेले पेन ड्राईव्ह बाहेर काढणार; परिणय फुके

Parinay Fuke Over Anil Deshmukh | राज्यातील आजी-माजी गृहमंत्र्यांच्या वादात आता भाजपचे नवनिर्वाचित आमदार परिणय फुके यांनी उडी घेतली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : राज्यातील आजी-माजी गृहमंत्र्यांच्या वादात आता भाजपचे नवनिर्वाचित आमदार परिणय फुके यांनी उडी घेतली आहे. अनिल देशमुख गृहमंत्री असता पोलिस भरती व इतर कामांमध्ये जे घोटाळे झाले आहेत, त्याचे पुरावे असलेले अनेक पेन ड्राईव्ह भाजप बाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. सोबतच वैद्यकीय कारणावरून बाहेर असलेल्या देशमुखांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली.

दोन दिवसांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी फडणवीस यांनी दबाव टाकला होता. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह चार नेत्यांच्या विरुद्ध खोटे प्रतिज्ञापत्र भरून देण्यास आपणास सांगितले होते, असा आरोप देशमुख यांनी केला होता.

त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख महाविकास आघाडीच्या नेत्यांविरुद्ध काय बोलले त्याचा पेन ड्राईव्ह आपल्याकडे असल्याचे सांगून त्यांना इशारा दिला होता. यास देशमुखांनी लगेच उत्तर दिले. तुमच्याकडे असलेला पेन ड्राईव्ह जगजाहीर करावा असे आव्हान त्यांनी दिले. सोबतच फडणवीस व भाजपच्या काळात झालेल्या घोटाळ्याचे पेन ड्राईव्ह आपल्याकडे असल्याचे सांगून त्यांनी भाजपला कोंडीत पकडले होते. यात आता आमदार फुके यांनी उडी घेतली आहे.

अनिल देशमुख वैद्यकीय कारणावरून जामिनावर आहेत. ते पुरावे नष्ट करून शकतात. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करावा अशी मागणी फुके यांनी केली. अनिल देशमुख बिनबुडाचे आरोप करीत आहेत. फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस यांनी जे पेन ड्राईव्ह दाखवले असे अनेक पेन ड्राईव्ह बाहेर येतील. गृहमंत्री असताना देशमुखांना काय काय घोटाळे केले हे सर्व समोर येणारच आहेत. त्यांनी केंद्र सरकारवर आरोप केले. न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा तुरुंगात जावे लागणार असल्याचेही फुके यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

'25 व्या वर्षी मला मोठा दिसतो म्हणून मालिकेतून काढलं' करिअरबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला...'मी खूप रडलो आणि...'

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

Hanuman Jayanti: अयोध्येत प्रभूरामाचे दर्शन घेण्याआधी या हनुमानाचे घ्यावे लागते दर्शन ; काय आहे पहाटेच्या 'गुप्त' पूजेचे गुपित?

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT