Cancer diagnosis will now accurate Photo acoustic imaging technology developed at VNIT sakal
नागपूर

Cancer Diagnosis : कॅन्सरचे निदान आता होणार अचूक; व्हीएनआयटीत ‘फोटो अकॉस्टिक इमेजिंग’ तंत्रज्ञान विकसित

कॅन्सरचे निदान उशिरा होणे हे कन्सरच्या उपचारासाठी मारक ठरणारी बाब आहे

मंगेश गोमासे : @mangeshG_sakal

नागपूर : विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातील सहायक प्राध्यापकाने ‘फोटो अकॉस्टिक इमेजिंग’ हे तंत्र विकसित केले आहे त्यामुळे कॅन्सरचे अचूक निदान होणे शक्य होणार आहे.

कॅन्सरचे निदान उशिरा होणे हे कन्सरच्या उपचारासाठी मारक ठरणारी बाब आहे. लवकर निदान झाल्यास त्यावर उपचार आणि रुग्णाला योग्य उपचार मिळतात व मृत्यूचा धोका अधिक कमी होतो. त्यासाठी डॉ. शोगत सिन्हा यांनी कॅन्सरचे अचूक निदान करण्यासाठी आवश्‍यक तंत्रज्ञानावर संशोधन सुरू केले.

त्यांच्या संशोधनासाठी एसीआरबी आणि स्पार्क (एसपीएआरसी) यांच्याकडून निधी उपलब्ध झाला. त्यांनी ‘फोटो अकॉस्टिक इमेजिंग’ हे अनोखे तंत्रज्ञान विकसित केले. त्यामुळे अगदी अचूक निदान करणे शक्य होणार आहे. यासाठी त्यांना पदव्युत्तर पदवी शाखेतील विद्यार्थी टोलकापियान रामास्वामी यानेही सहकार्य केले.

काय आहे संशोधन

डॉ. शोगत सिन्हा यांनी विकसित केलेले ''फोटो अकॉस्टिक इमेजिंग'' तंत्रज्ञान याचा वापर करताना तो शरीरातील सॉफ्ट टिशूवर लेजर लाईटच्या माध्यमातून गरम केल्यास त्यातून निघणाऱ्या कंपनामुळे त्यात काय आहे याची इमेज तयार होते. त्यातून कॅन्सर आहे किंवा नाही हे अचूक निदान होण्यास मदत होते.

कॅन्सर आजार दुर्धर असल्याचे लवकर कळल्यास त्यावर लवकर उपचार शक्य होते. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास अचूक माहिती मिळणे सोपे होणार आहे.

- डॉ. शोगत सिन्हा, सहाय्यक प्राध्यापक,इलेक्ट्रॉनिक्स विभाग, विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्था. (व्हीएनआयटी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mill Workers House: मुंबईसह ठाणे, मिरा-भाईंदरमध्येही घरे, गिरणी कामगारांसाठी म्हाडाचं मोठं पाऊल; जागेचा शोध सुरू

'एक अधिकारी, एक कार', सरकारी ताफ्यावर मोदी सरकारचा मोठा निर्णय; गैरवापर आणि खर्च कमी होणार

Latest Live Updates Marathi : राधानगरी भरले ९३ टक्के कोल्हापूर जिल्ह्यातील १७ बंधारे पाण्याखाली

Ambernath: १२व्या मजल्यावरून मांजरीला फेकलं, इसमाचं अमानुष कृत्य CCTVत कैद; अंबरनाथमधील घटनेने हळहळ

Power Bank Damage Signs : पॉवर बँक खराब होण्यापूर्वी देते 'हे' 5 इशारे; दुर्लक्ष करणे ठरू शकते धोकादायक

SCROLL FOR NEXT