Accident Sakal
नागपूर

Accident : आधी कारने दिली दुचाकीला धडक नंतर महिलेला चिरडले; महिलेसह दोघांचा मृत्यू

रामनगर परिसरातील सर्कलजवळ कारने दुचाकी स्वाराला धडक देत, पायी जाणाऱ्या महिलेला चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - रामनगर परिसरातील सर्कलजवळ कारने दुचाकी स्वाराला धडक देत, पायी जाणाऱ्या महिलेला चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाला. हा भीषण अपघात रविवारी सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास घडला. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली. राजेंद्रकुमार मातादीन चौरसिया ( वय ६२ ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कारचालकावर गुन्हा दाखल केला असून चालकाचा शोध घेत आहेत.

कुसुमाबाई ईश्वर भोयर (वय ६४, रा. संजय नगर पांढराबोडी) आणि पावस राजेद्रकुमार चौरसिया (वय ३३, रा. श्रीराधे अपार्टमेंट, हिलटॉप)अशी मृतकाची नावे आहेत. पावस युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीत कामाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी व्यवसाय करणारे राजेंद्रकुमार चौरसिया हे आपल्या मुलासह रामनगर येथील राममंदिराच्या रस्‍त्यावरून मोपेडवर (एम.एच.४० बी.एच ३६२५) रवीनगरच्या दिशेने जात होते. त्याच्या बाजून पायी कुसुमाताई भोयर या नातेवाईकांसह जात पायी जात होत्या.

मोपेडच्या मागून कार (एम.एच. ३१ सी.पी. ५३२२) भरधाव वेगाने आली. कारने प्रथम मोपेडला जोरदार धडक दिली. त्यामुळे राजेंद्रकुमार चौरसिया हे खाली पडले आणि त्यांचा मुलगा पावस हा दुचाकीसोबत काही दूर घासत गेला. दरम्यान बाजूला असलेल्या कुसुमाताई भोयर त्यांच्या धक्क्याने खाली पडल्या. त्यांच्या अंगावरून कार त्यांना चिरडून निघाली. यामुळे त्यांचा जागी मृत्यू झाला.

पावस चौरसिया यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सायंकाळी त्यांचाही मृत्यू झाला. पोलिसांना राजेंद्रकुमार मातादीन चौरसिया यांनी दिलेल्या तक्रारीवरून विनोद म्हात्रे यांनी गुन्हा दाखल केला. वाहन चालक अद्यापही फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

आरोपी चालक वकिलाचा मुलगा

रविनगर परिसरात आपल्या महागड्या कारने महिलेला चिरडत मोपेडला धडक देणारा २४ ते २५ वर्षीय युवक नागपुरातील एका मोठ्या वकिलाचा मुलगा असल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता, तोही अपघातात जखमी झाला असून त्याचावर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोमवारी त्याला पोलिस ताब्यात घेण्याची शक्यता आहे. दरम्यान अपघात इतका भीषण होता की, परिसरात महिलेच्या रक्ताचा सडा पडल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT