Nagpur Munna Yadav Esakal
नागपूर

Munna Yadav Nagpur: नागपूरात पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या भाजपच्या बड्या नेत्यासह मुलांवर गुन्हा

BJP Leader Nagpur: या घटनेनंतर दोन्ही गटांनी धंतोली ठाणे गाठले. तिथेही दोन्ही गटांकडून वाद घालण्यात आला. त्यामुळे खुद्द परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी ठाणे गाठले.

आशुतोष मसगौंडे

भाजपचे नेते मुन्ना यादव यांच्यासह त्यांच्या मुलांकडून धंतोली ठाण्यात पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादव बंधुदरम्यान धंतोली ठाण्यात झालेल्या राड्यादरम्यान हा प्रकार घडला होता.

भारतीय जनता पक्षाचे नेते मुन्ना यादव यांची मुले करण व अर्जुन शनिवारी सायंकाळी घरासमोर उभे असताना. बाला यादव याची मुले व त्यांच्या साथीदारांनी करण व अर्जुनवर शस्त्र व काठीने हल्ला केला. त्याला प्रतिउत्तर म्हणून त्यांच्यावरही करण आणि अर्जुन आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केला. त्यामुळे दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली होती.

यामध्ये करण आणि अर्जुन यांच्यासह बाला यादव यांची मुलेही जखमी झाली होती. त्यापैकी एकाला डोक्याला गंभीर दुखापत झाली.

या घटनेनंतर दोन्ही गटांनी धंतोली ठाणे गाठले. तिथेही दोन्ही गटांकडून वाद घालण्यात आला. त्यामुळे खुद्द परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी ठाणे गाठले.

यावेळी दोन्ही गटाला शांत करीत असताना, मुन्ना यादव आणि त्याच्या दोन्ही मुलांनी ठाण्यात राडा घातला. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मुन्ना यादव हे राज्य इमारत बांधकाम मंडळाचे माजी अध्यक्ष असून ते भाजपचे नागपूरमधील महत्त्वाचे नेते आहेत. आता मुन्ना यादव यांच्यासह दोन मुलांवर पोलिसांवर शिवीगाळ केल्याप्रकरणी शासकीय कामात अडथळ्याचा निर्माण केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस अंमलदार सुभाष वासडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्याची सुट्टी! कर्णधारपद अन् संघातली जागाही जाणार, टी२०चा 'नवा बॉस' कोण?

OBC कार्ड खेळत काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! बी. के. हरिप्रसाद बनले कर्नाटक काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; डी. के. शिवकुमारांची जागा घेणार, सतीश जारकीहोळींचा पत्ता कट!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी वाचा एका क्लिकवर!

T20 Mumbai Women's league मध्ये फाल्कन्सच्या विजयात भारतीय स्टार सायली सातघरे अन् १४ वर्षीय स्वरा जाधव चमकली

Burning ST Bus : चांदवडजवळ ‘बर्निंग बस’चा थरार! चालक-वाहकांच्या प्रसंगावधानामुळे ५४ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT