category not mention in post graduation online admission list in nagpur university  
नागपूर

पदव्युत्तर ऑनलाइन प्रवेशाची यादी जाहीर झाली, पण नावे पाहताच विद्यार्थ्यांना बसला धक्का

राजेश चरपे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे राबवण्यात येणाऱ्या केंद्रीय ऑनलाइन पदव्युत्तर प्रवेशाची यादी जाहीर झाली आहे. त्यात कोणाला कुठल्या प्रवर्गात प्रवेश देण्यात आला याचा उल्लेख नसल्याने विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. 

पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यापीठात केंद्रभूत प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन असून प्रवेशाचा पहिला टप्पा सुरू आहे. विद्यापीठाचे विभाग आणि संलग्नित महाविद्यालयात एम.कॉमच्या ३ हजार २०८ , एमएस.स्सी.च्या ४ हजार ९८३ तर एमए अभ्यासक्रमाच्या १० हजार ८६५ जागांचा समावेश आहे. याशिवाय एमएस.स्सी. फॉरेन्सिक सायन्स आणि एम.लिब. यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या २४० जागा आहेत. या जागांसाठी ३० डिसेंबरला गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. यानंतर तीन जानेवारीला जागा वाटप यादी जाहीर करण्यात आली. मात्र, ही यादी जाहीर होताच विद्यार्थ्यांचा संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे एम.एसस्सी. प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्याने या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे तक्रारी केल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जागा जाहीर करण्यात आल्या त्यांच्या नावावर त्यांना कुठल्या प्रवर्गातून निवड करण्यात आली याचा स्पष्ट उल्लेख नसून त्यांचा प्रवर्ग लिहिण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, केंद्रीय प्रवेश समितीने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, गुणवत्तेच्या आधारावर ज्या विद्यार्थ्यांनी आरक्षित प्रवर्गातून अर्ज केला असला तरी त्यांना खुल्या वर्गातून प्रवेश देण्यात येतो. त्यामुळे काही आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या वर्गातून प्रवेश दिला आहे. त्यामुळे एखाद्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अधिक प्रवेश मिळाल्याचे दिसून येते. मात्र, यात कुठलाही गोंधळ नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी योग्य कालावधीमध्ये प्रवेश घ्यावा अशा सूचनाही देण्यात आल्या. 

ऑनलाइन प्रक्रियेत विद्यार्थ्यांची पिळवणूक -
विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन प्रवेशाच्या नोंदणीसाठी दोनशे रुपये घेतले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विद्यापीठाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार नाही अशी अपेक्षा असते. मात्र, बाहेर शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासंदर्भात विविध कामांसाठी विद्यापीठात बोलावले जात असल्याचा आरोप काही विद्यार्थी संघटनांनी केला आहे. त्यामुळे ऑनलाइन प्रवेश असताना विद्यार्थ्यांचा त्रास थांबवावा अशी मागणी होत आहे. 

असे आहे जागा वाटप - 

  • एम.एसस्सी. - २६९४ 
  • एम.कॉम.-३४६० 
  • एम.कॉम.(प्रोफेशनल)- २४० 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT