Cement prise is incrising also in lockdown  
नागपूर

लॉकडाऊन असतानाही वाढले सिमेंटचे भाव!

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनामुळे लॉकडाऊनमधून अद्याप मुक्तता झाली नसताना यंदाही देशातील सात ते आठ मोठ्या कंपन्यांनी उन्हाळ्यात एकत्रितपणे साखळी (कार्टेल) करून सिमेंटची दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला क्रेडाई या आघाडीच्या संघटनेने विरोध केला आहे. केंद्र शासनाने हस्तक्षेप करून मंदीच्या गर्तेत अडकलेल्या बांधकाम व्यवसायाला गती देण्यासाठी हस्तक्षेप करून दरवाढ थांबवावी, अशी मागणी केली.

सिमेंट कंपन्या दरवर्षी उन्हाळ्यात सिमेंट दर वाढवितात. यंदा कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे या दरवाढीतून मुक्तता मिळेल असे वाटत होते. मात्र, ती फोल ठरण्याची शक्‍यता आहे. सर्व सिमेंट कंपन्यांनी मे महिन्यापासून गोणीमागे 40 रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 358 रुपयाला मिळणारी नामांकित कंपनीची सिमेंटची गोणी आता वाहतूक खर्चासह चारशे दहा रुपयांच्या घरात जाणार आहे. राज्यभरातील वितरकांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. मे महिन्यापासून त्याची अंमलबजावणी होण्याचे संकेत आहेत.
बांधकाम व्यावसायिक जीएसटी, नोटाबंदी आणि रेसामुळे संकटात सापडले आहेत. त्यात कोरोना आल्याने बांधकाम व्यावसायिकांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. दरम्यान, सिमेंट कंपन्यांनी लॉकडाऊन उठण्यापूर्वीच सिमेंटमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्याने बांधकाम व्यावसायिकांसह वितरकांमध्ये चिंता आहे.
अंबुजा, अल्ट्राटेक, एसीसी, बिर्ला ए-1 या नामांकित कंपनीची सिमेंटची गोणी लॉकडाऊन आधी 350 ते 360 रुपयांना होती. सोबतच आंध्र-तेलंगणाकडील डेक्कन, रामको, सागर, महा या सिमेंट कंपनीची गोणी 280 ते 305 रुपयांना होती. या सर्व सिमेंट कंपन्यांनी एक मेपासून प्रत्येक सिमेंट गोणी मागे 40 रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरवाढीला विरोध

बांधकाम व्यावसायात मंदी आल्याने सिमेंटची मागणी कमी झाली. अशात वर्षभरात दुसऱ्यांदा सिमेंटची दरवाढ करण्याचा प्रयत्न सिमेंट कंपन्यांनी चालविला आहे. कंपन्यांच्या या हेकेखोरीवर शासनाने लगाम घालण्याची गरज आहे. सिमेंटच्या दरवाढीला क्रेडाईचा विरोध आहे. दरवर्षी सिमेंट कंपन्या कार्टेल करून भाववाढ करीत असतात. त्याबद्दल शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असतो. या भाववाढीला आमचा विरोध आहे.
प्रशांत सरोदे, माजी अध्यक्ष, क्रेडाई महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT