Youth Congress agitation
Youth Congress agitation sakal
नागपूर

नागपूर : अग्निपथ योजनेविरुद्ध युवक काँग्रेसचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात शनिवारी युवक कॉंग्रेसने आंदोलन केले. केंद्र सरकारविरोधात घोषणा देताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा मानणाऱ्या २५ टक्के तरुणांना या योजनेद्वारे सैन्यात घेतले जाणार असल्याचा आरोपही युवक कॉंग्रेसने केला. यावेळी रस्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने संविधान चौकात वाहतूक कोंडी झाली होती.

युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके यांच्या नेतृत्त्वात झिरो माईल ते संविधान चौकापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. संविधान चौकात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत अग्निपथ योजनेला विरोध केला. यावेळी बंटी शेळके यांनी देशातील तरुणांचे भविष्य टांगणीला लावणारी ही योजना असल्याचा आरोप केला.

गांधीजींच्या शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहे, परंतु प्रसंगी भगतसिंग यांच्या मार्गाचाही अवलंब करण्यात येईल, असा इशारा देत शेळके यांनी योजनेचा विरोध करताना कुठेही जाळपोळ किंवा हिंसक कारवाया कुणी करू नये, असे आवाहन केले. देशातील बेरोजगारांच्या पाठीशी युवक कॉंग्रेस उभी आहे. जोपर्यंत ही योजना मागे घेतली जाणार नाही, तोपर्यंत युवक कॉंग्रेसचे आंदोलन सुरूच राहणार आहे, असेही शेळके म्हणाले.

दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर कृषी कायदे रद्द करण्यात आले होते, त्याचप्रमाणे ही अग्नीपथ योजनाही रद्द करावी, अशी युवक कॉंग्रेसची मागणी आहे. केंद्र सरकारने हा विषय ताणून धरला, तर आम्ही अखेरपर्यंत पाठपुरावा करू, पण ही अन्यायकारक योजना रद्द करण्यास केंद्र सरकारला भाग पाडू, असे बंटी शेळके म्हणाले. या आंदोलनादरम्यान पोलिस बंदोबस्त होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT