Trucks standing still due to strike. esakal
नागपूर

'किसी ट्रक ड्रायव्हर को नहीं लगता, मौत हो',चालकांनी व्यक्त केल्या भावना, नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम

‘किसी ट्रक ड्रायव्हर को नहीं लगता, मौत हो... हमारे भी परिवार हैं’असेही ट्रकचालक बोलून गेले.

सकाळ डिजिटल टीम

Tanker Driver Strike: अपघात झाल्यावर कुणाची चूक आहे हे आधी तपासणे गरजेचे आहे. पण याची शहानिशा करता ट्रकने अपघात झाल्यावर लोक आधी ट्रकचालकाला बेदम मारहाण करतात. यात अनेकांचे जीव जातात. चूक असेल तर तुरुंगात टाका, पण चूक नसतानाही आम्हालाच धारेवर धरले जाते. हे थांबायला हवे, अशी भावना व्यक्त करतानाच ‘किसी ट्रक ड्रायव्हर को नहीं लगता, मौत हो... हमारे भी परिवार हैं’असेही ट्रकचालक बोलून गेले.

सोमवारी नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलनादरम्यान ट्रकचालकांनी आपल्या व्यथा बोलून दाखविल्या. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातास जबाबदार ट्रकचालकास १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

सोबतच सात लाख रुपये दंडही आकाराला जाणार आहे. विशेष असे की, अपघात झाल्यानंतर जखमीला रुग्णालयात पोचवण्याची सक्ती या कायद्यात केली आहे. जखमीपर्यंत पोचण्यापूर्वीच लोक ट्रकचालकाला मारहाण करतात, यामुळे धास्तावलेल्या ट्रकचालकांनी या कायद्याच्या विरोधात नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावर सकाळपासून चक्काजाम केला.

या कायद्यात वाहनचालकाविरोधात, खास करून ट्रक चालकांविरोधात एकतर्फी कारवाईची तरतूद करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. अपघातस्थळावर थांबल्यावर चूक नसतानाही लोक ट्रकचालकाला मारहाण करतात. यामुळेच ते पळून जातात, असे ट्रक चालकांचे म्हणणे आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Silver Import: सोनेनंतर आता चांदीवरही केंद्र सरकारचा मोठा निर्णय! नवे नियम लागू केले; आता अतिरिक्त मंजुरी लागणार

KKR vs GT: 22 Sixes...! फिन ऍलेन, रघुवंशीची वादळी खेळी, पण शतक हुकलं; कोलकाताने IPL 2026 मध्ये कोणालाच न जमलेला पराक्रमक केला

Electric Scooter : फक्त 1 रुपयांत 4 कि.मी. प्रवास; किंमत 45 हजार, 'ही' आहे सगळ्यात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर

Junnar Crime : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून; पत्नीने आत्महत्या केल्याचा पतीने रचला बनाव

Mumbai: मुंबईत वाहतूक कोंडी कमी होणार, नवा सहा पदरी पूल उभारणार, बीएमसीचा मोठा निर्णय; कसा असेल प्रोजेक्ट?

SCROLL FOR NEXT