नागपूर

केंद्राकडून म्युकरमायकोसिसच्या अवघ्या २०० इंजेक्शन्सचा पुरवठा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः म्युकरमायकोसिसच्या (Mucormycosis) रुग्णाला तीस ते चाळीस इंजेक्शन लागतात. मात्र केंद्राकडून (Government of India) फक्त दोनशे इंजेक्शनचा पुरवठा होत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन कोटा वाढवून देण्यात यावा, अशी मागणी पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केली. (Lockdown is still necessary in Nagpur said Nitin Raut)

मुक्यमसायकोसिसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याकरिता वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा तुटवडा आहे. केंद्र सरकारला आम्ही कोटा वाढवून देण्याची मागणी केली होती. तो अद्याप वाढवून दिलेला नाही. इंजेक्शनची निर्मिती केंद्र सरकारने आपल्याकडे घेतली आहे. ते ज्या पद्धतीने देतील त्या पद्धतीनं वाटप होईल. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी ती पुन्हा वाढू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

कोरोनाच्या संदर्भात आढावा बैठक आज विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर व कोरोना टास्क फोर्सचे अधिकारी उपस्थित होते.

मुलांसाठी ७०० खाटांचे कोविड सेंटर

लहान मुलांसाठी ७०० बेड्सचे कोविड सेंटर उभे केले जाणार आहे. सुरुवातीला ३५० ब्रेड्स उपलब्ध होतील. ५० कोटी सीएआर निधीतून आपण उपलब्ध करून दिल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले.

(Lockdown is still necessary in Nagpur said Nitin Raut)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'ची दादागिरी संपणार? पुतीन यांची भारताला मोठी ऑफर! दोन्ही देशांना सापडला नवा व्यापारी मार्ग

Charas Seized : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक कोटींचे चरस जप्त; बँकॉकहून आलेल्या महिला प्रवाशाकडून कॉस्मेटिकच्या डब्यांतून तस्करी

Lohgaon News : लोहगाव अत्याचार प्रकरण; आरोपीला कठोर शिक्षेची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

Nagpur Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून; आरोपीला अटक, दोन महिन्यांपूर्वी आला होता कारागृहातून सुटून

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

SCROLL FOR NEXT