नागपूर

Central Railway: धुक्यातही रेल्वे धावणार सुसाट! मध्य रेल्वेकडून यंत्रणा विकसित, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठे पाऊल

मध्य रेल्वेने नावीन्यपूर्ण धुके सुरक्षा यंत्र फॉग सेफ्टी डिव्हाईस (एफएसडी) विकसित केले आहे. याचा फायदा रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यासाठी होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Central Railway: हिवाळ्यात दाट धुक्यामुळे मार्गावरचे काहीच दिसत नाही. त्याचा परिणाम वाहतूक सेवेवर होतो. अशा स्थितीत मध्य रेल्वेने नावीन्यपूर्ण धुके सुरक्षा यंत्र फॉग सेफ्टी डिव्हाईस (एफएसडी) विकसित केले आहे. याचा फायदा रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यासाठी होणार आहे.

दाट धुक्यामुळे रेल्वेची सिग्नल दृश्यमानता कमी होऊन चालकांना अडचण होते. अपघाताची शक्यता बळावून प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे चालकांना मदत करण्याच्या उद्देशाने हे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. हे यंत्र धुके जीपीएस तंत्रज्ञानावर चालते.

चालकांना आगामी तीन सिग्नल्सबाबत ऑडिओ आणि व्हिज्युअल संकेतांद्वारे सूचना देते. वास्तविक स्थानाच्या ५०० मीटर आधी सिग्नलची दिशा जाहीर करून रेल्वे चालकांना त्यांच्या गाड्या सुरक्षितपणे हाताळण्यासाठी अधिक सतर्क राहण्यास मदत करते.

तसेच धुक्यामुळे रेल्वेचा वेग सामान्यतः ३०-६० किमी प्रतितास असतो. फॉग सेफ्टी डिव्हाईस (एफएसडी)मुळे ७५ किमी प्रतितास वेग मिळतो. त्यामुळे रेल्वेचा खोळंबा करणारा कालावधी कमी होतो. प्रतिकूल हवामानातही रेल्वे परिचालनाची सुरक्षितता आणि कार्यक्षता वाढविते.

या विभागातील गाड्यांमध्ये यंत्रणा
नागपूर- २२० उपकरणे, मुंबई- १०, भुसावळ- २४८, सोलापूर-९ आणि पुणे विभागात १० उपकरणे बसविण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

'त्या'व्हायरल व्हिडीओवर अखेर गौतमी पाटील बोलली, म्हणाली... 'लाज नाही वाटली?'

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

Mumbai News: जीटीबीनगरवासीयांना भाड्याचा दिलासा! निवासींना २० तर गाळेधारकांना १० हजार रुपये

Pachod News : दावरवाडी परिसरातील सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रेच पडलीत आजारी!

SCROLL FOR NEXT