चंद्रशेखर बावनकुळे Sakal
नागपूर

ओबीसींशिवाय निवडणूक घेण्याचे मनसुबे - चंद्रशेखर बावनकुळे

महाविकास आघाडी सरकार केवळ टाईमपास करीत असल्याचा आरोप

राजेश चरपे

नागपूर - ओबीसींचा इम्पेरिकल डाटा चुकीच्या पद्धतीने गोळा केला जात आहे हे ठावूक असताना झोपा काढत आहे का असा सवाल उपस्थित करून माजी ऊर्जामंत्री तसेच भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकार केवळ टाईमपास करीत असल्याचा आरोप केला.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आडनावावर ओबीसींचा डाटा गोळा केला जात आहे असे सांगून एकाच आडनावाचे लोक वेगवेगळ्या समाजाचे आहे याकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर ओबीसी खात्याचे मंत्री विजय वडेट्‍टीवार आणि ओबीसी समाजाचे नेते अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी ही चूक मान्य केली. आता त्यात दुरुस्त्या केल्या जाईल, असे सांगितले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयात तातडीने इम्पेरिकल डाटा सादर करायचा आहे. त्यास उशिर झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींना आरक्षण गमवावे लागणार आहे. त्यामुळे सरकारच टाईमपास करीत असल्याची शंका बावनकुळे यांनी व्यक्त केली. तुम्हीच आयोगाला चुका करायला सांगता. महाराष्ट्रात दौरे करायला सांगता. ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला, त्याच दिवशी इम्पिरिकल डेटा तयार करण्याचे काम सुरू व्हायला पाहिजे होते. आता हे लोक लोकांच्या आडनावांवरून जात लिहितील आणि उद्या कुणी आक्षेप घेतला की, तो डेटा खराब होईल, कामात येणार नाही.

सर्वोच्च न्यायालयात हे सरकार पुन्हा लाथाडल्या जाईल आणि ओबीसींना राजकीय आरक्षण गमवावे लागले अशी भीती आता निर्माण झाली आहे. ओबीसींशिवाय निवडणुका घेण्याचे मनसुबे या सरकारने आखले आहेत. त्यामुळेच जाणीवपूर्वक चुकीचा आणि खोटा डेटा न्यायालयाला सादर करण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. पुन्हा टाइमपास करून याही निवडणुका पार पाडतील, हेच यांचे ठरलेले आहे. ओबीसींना आरक्षण द्यायचेच नाही, असेच या सरकारने ठरवलेले आहे, असेही आमदार बावनकुळे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT