Chandrashekhar Bawankule and Anil Bonde Chandrashekhar Bawankule and Anil Bonde
नागपूर

चंद्रशेखर बावनकुळे, अनिल बोंडे यांना घेतले ताब्यात; काळी दिवाळी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मुख्यमंत्री यांचे निवासस्थान असलेल्या रामगिरीवर काळी दिवाळी साजरी करण्यास गेलेले माजी मंत्री कृषी मंत्री अनिल बोंडे, माजी मंत्री तसेच भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी आंदोलकांना हुसकावून लावले.

आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. वेळेवर पंचनामे केले जात नाही. नैसर्गिक आपत्तीची मदतही दिली जात नसल्याने बोंडे यांनी रामगिरीवर काळी दिवाळी साजरी करण्याचा इशारा सरकारला दिला होता. त्यानुसार सकाळी ११ वाजताच्या सुमारे बोंडे, बावनकुळे यांच्यासह काही शेतकरी मोर्चाने रामगिरीकडे रवाना झाले. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अडविले. त्यामुळे आंदोलक आणि पोलिस यांच्यात बाचाबाची व धक्काबुक्की झाली. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, तूर, धान सर्व पिके उद्वस्त झाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, आम्ही बांधावर जाऊन एकरी २५ हजार रुपये देऊ. बागायतदारांना ५० हजार रुपये प्रतिएकर देऊ. उद्धव ठाकरे तर आलेच नाहीत, पण साधे पंचनामेही केले नाहीत. पंचनामे केले नाहीत, तर मग नुकसान भरपाई मिळणार कशी मिळणार, असे बोंडे म्हणाले.

फडणवीस सरकारने एकही वीज कनेक्शन कापले नाही

ऐन दिवाळीला ४५ हजार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहे. केवळ १०० रुपयांसाठी घरगुती वीज कापली जात आहे. फडणवीस सरकार असताना पाचही वर्ष एकाही शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन आम्ही कापले नाही. मोगल आणि इंग्रजांपेक्षाही हे सरकार शेतकरी आणि सामान्य माणसासोबत वाईट वागत असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk Video : सोनम वांगचुक यांनी उपोषण का सोडले, सरकारशी काय चर्चा झाली? व्हिडिओ शेअर करत सगळंच सांगितलं

भारतीय संघ 'घरच्या' मैदानावर पाहुणा म्हणून खेळणार! बाहेरचा संघ यजमान म्हणून मिरवणार; नेमकं असं का होणार? जाणून घ्या वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : आज रात्री आम्हाला अटक केली जाऊ शकते; CJP संस्थापक अभिजीत दीपके यांचा दावा

Car Stunt Video: धावत्या कारच्या छतावर बसून जीवघेणा स्टंट! Video Viral होताच पोलिसांची कारवाई, तरुणाने कान पकडून मागितली माफी

CM Joseph Vijay Movie : कायदेशीर लढाई आणि सेन्सॉरच्या आक्षेपानंतर अखेर 'जननायकन' रिलीज! थलपती विजय यांच्या शेवटच्या चित्रपटाची धमाकेदार एन्ट्री, 50 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती

SCROLL FOR NEXT