Charkha weighing 40 grams in Limca Book of Records Honoring Jayant Tandulkar of Nagpur sakal
नागपूर

‘लिम्का बुक’मध्ये ४० ग्रॅम वजनाचा चरखा; नागपूरमधील जयंत तांदुळकर यांचा सन्मान

आगळावेगळा छंद जोपासणारे शहरातील जयंत तांदुळकर यांनी तयार केलेल्या नखावर ठेवता येणारा चरख्याची लिम्का बुक ऑफ रेकार्ड्समध्ये नोंद

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आगळावेगळा छंद जोपासणारे शहरातील जयंत तांदुळकर यांनी तयार केलेल्या नखावर ठेवता येणारा चरख्याची लिम्का बुक ऑफ रेकार्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे. मागील आठवड्यात त्यांना याबाबतचे प्रमाणपत्र मिळाले आहे.

तांदुळकर यांच्या या ४० मिलिग्राम वजनाच्या चरख्याची यापूर्वी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ व ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’नेही नोंद घेतली आहे, हे विशेष. झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी व महालेखाकार कार्यालयात वरिष्ठ लेखापाल पदावर कार्यरत जयंत तांदुळकर पक्षीप्रेमी असून विविध छंदही जोपासतात.

त्यांनी अनेक आश्चर्यकारक वस्तू तयार केल्या आहेत. त्यापैकी सर्वांत लहान आकाराच्या चरख्याने शहराचाही गौरव वाढवला. तांदुळकर यांनी २०२० मध्ये ३.२० मिमी लांबी, २.६८ मिमी रुंदी आणि ३.०६ मिमी उंचीचा चरखा तयार केला. या चरख्याचे वजन केवळ ४० मिलिग्राम आहे.

चरख्याची वैशिष्ट्ये

  • चरखा तयार करण्यासाठी लहान काड्या, स्टीलची तार आणि कापसाच्या सूताचा वापर

  • एवढा लहान आकार असून या चरख्यावर सूत कातले जाते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुज'ची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणने घातली 'ही' अट; जगभरातले देश टेंन्शनमध्ये

'अजूनही धडा घेतला नाही...'; NEET पेपर लीकवर NTA ला फटकारत सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि CBI ला नोटीस

Pune: तरुणीला पाहत भररस्त्यात हस्थमैथून, तरुणाचं अश्लील कृत्य कॅमेरात कैद; संतापजनक प्रकाराने पुण्यात खळबळ

Yewalewadi Murder Case: येवलेवाडीत चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून पत्नीचा गॅस टाकीने खून

Latest Marathi News Live Update नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड; मनिषा वाघमारे आणि प्रल्हाद कुलकर्णी सीबीआय न्यायालयात हजर

SCROLL FOR NEXT