jail 
नागपूर

ठकबाज प्रीती दास जेलमध्ये क्वारंटाइन

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : "लुटेरी दुल्हन' प्रीती दासची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. जेल प्रशासनाने कोरोनाच्या महामारीमुळे प्रीतीला विशेष यार्डात क्वारंटाइन केले आहे. तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तीन महिला जेल कर्मचाऱ्यांना तैणात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी प्रीती दासच्या फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला आहे. पोलिस उपायुक्‍त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात तपास होत असल्यामुळे आता प्रीतीशी संबंधित असलेल्या राजकीय आणि पोलिस खात्यात असलेल्या अनेकांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. गुड्‌डू तिवारीला लग्नाचे आमिष दाखवून 14 लाख रुपयांनी फसवणूक प्रकरणात प्रीतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

त्याच गुन्ह्यात प्रीतीला मध्यवर्ती कारागृहात जावे लागले आहे. जेल प्रशासनाने कोरोनाचे संकट पाहता प्रीतीला कारागृहातील एका विशेष यार्डात ठेवले क्‍वारंटाइन केले आहे. प्रीतीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. कच्चा कैदी म्हणून तिला आता कारागृहात ठेवण्यात येणार आहे.

प्रीतीचे "वजन' घटले

प्रीती दास ही हायप्रोफाइल व्यक्‍तिमत्त्व म्हणून समाजात वावरत होती. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत तिचे उठणे-बसणे होते. मात्र, तिला अटक होताच तिचे "वजन' घटले. तिच्या वाचविण्यासाठी धडपड करणारे काही कार्यकर्ते आणि पोलिस अधिकाऱ्यांनी प्रीतीपासून दुरावा निर्माण केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heavy Rain Alert: कर्जत घाटात दरडींचा तडाखा; मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प, १६ गाड्या रद्द

U19 IND vs SL : ९ चौकार अन् १ षटकार... द्रविडच्या लेकाची जोरदार फटकेबाजी; पण श्रीलंकेने सामना जिंकत केली ODI मालिकेत बरोबरी

Thane Rain Red Alert: ठाण्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट; सर्व गडकिल्ले, धबधबे व पर्यटनस्थळांवर पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी

Latest Marathi News Live Update: निदा खानला अखेर जामीन मंजूर

Raigad Ratnagiri Traffic: बार्जेसची धडक बसून सावित्री नदीवरील आंबेत पूल वाहतुकीसाठी तात्पुरता बंद; रायगड-रत्नागिरी दळणवळण ठप्प

SCROLL FOR NEXT