Cheating by asking to download the app Nagpur crime news
Cheating by asking to download the app Nagpur crime news 
नागपूर

हॅकर्सचा सुळसुळाट : चुकूनही करू नका हे ॲप डाऊनलोड; एक निनावी फोन करेल तुमचं खातं रिकाम

अनिल कांबळे

नागपूर : ऑनलाइन खरेदी किंवा तिकीट रद्द केल्यानंतर पैसे रिफंड होण्यासाठी जर कुणी वेबसाइट किंवा कस्टमर केअर अधिकाऱ्यांना कॉल केल्यास सायबर गुन्हेगारांच्या रडारवर येऊ शकतो. तसेच काही गुन्हेगार थेट बॅंकेतून बोलत असल्याचे सांगून एटीएम ब्लॉक झाल्याचे सांगतो. पैसे परत मिळविण्यासाठी किंवा बॅंक खाते अपडेट करण्यासाठी टिम व्ह्युवर ॲप, एनी डेस्क किंवा क्वीक सपोर्ट ॲप डाऊनलोड करण्याचा सल्ला देतात.

यापैकी कोणतेही ॲप डाऊनलोड केल्यास आपल्या मोबाईलचा किंवा लॅपटॉपचा ॲक्सेस थेट सायबर गुन्हेगाराच्या मोबाईलवर जातो. हा फंडा वापरून सायबर गुन्हेगारांनी उपराजधानातील हजारो नागरिकांना कोट्यवधीने गंडविले आहे. मात्र, आतापर्यंत सायबर पोलिस ठाण्यात ९५ तक्रारी दाखल असून ५१ लाखांनी फसविल्याची नोंद आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून ग्राहकाला फोन केला जातो. फोनवर संवाद साधल्यानंतर ग्राहकांच्या बँक खात्याशी निगडित सगळी माहिती गोळा केली जाते. फोनवरून ते सांगत असलेल्या स्टेप्स फॉलो न केल्यास तुमची नेट बँकिंग सुविधा ब्लॉक होऊ शकते अशाप्रकारे ग्राहकांना भीती दाखविली जाते. खाते ब्लॉक होण्याच्या भीतीने ग्राहक समोरील व्यक्तीला बँके खात्याची माहिती देतो.

ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी एनी डेस्क, क्वीक सपोर्ट अथवा टीम व्ह्यूअर ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. ॲप्स डाऊनलोड केल्यानंतर ग्राहकांना व्हेरिफिकेशन करण्यासाठी ९ अंकाचा कोड मागितला जातो. या कोडच्या मदतीने ग्राहकांच्या मोबाईलमधील सगळ्या माहितीचा एक्सेस फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगाराला मिळतो. त्यामुळे हे तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपची स्क्रीन शेअर केली जाते.

स्क्रीनवर दिसणारी माहिती रेकॉर्ड केली जाते. तसेच मोबाईल थेट सायबर गुन्हेगार हाताळू शकतो. हे ॲप्स डाऊनलोड केल्यानंतर मोबाइलमधील पेमेंट ॲप्सचा वापर करून आपल्या खात्यातून परस्पर पैस काढतो. गुगलच्या प्लेस्टोअरवर टीम व्ह्युवर ॲप, एनी डेस्क किंवा क्वीक सपोर्ट हे तिन्ही ॲप सहज उपलब्ध आहेत. ग्राहकांनी हे मोबाइल ॲप्स डाउनलोड न करण्याचा इशारा बॅंकांनी दिला आहे.

ॲप्स डाऊनलोड करू नका
सायबर क्राईम करणारे ग्राहकांना भीती दाखवून काही ॲप्स डाऊनलोड करण्यास सांगतात. ते ॲप्स मोबाईलमध्ये इंस्टॉल करताच मोबाईल धारकाचे मोबाईलसह (ग्राहकाचे) बॅंक अकाउंट हॅक केले जाते. त्यामुळे असे ॲप्स डाऊनलोड करू नये. कुणीही अशाप्रकारे फसल्यास सायबर क्राईममध्ये तक्रार करावी.
- केशव वाघ,
सहायक पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT