file photo 
नागपूर

विक्रेत्यांचा मद्यसाठा तपासणार

नीलेश डोये

नागपूर : मद्य विक्रेत्यांच्या दुकानातील साठा तपासण्यात येणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी दिली. लॉकडाउनच्या काळात १२ वर विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून यातील काहींचे परवाने निलंबित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

साधारणतः मार्च महिन्यात मद्यविक्री परवान्याच्या नूतनीकरणाची प्रक्रीया सुरू होते. त्यासाठी लागणाला अवधी अनिश्चित असते. स्टॉक कमी पडू नये यासाठी विक्रेते अधिकचा साठा करून ठेवतात. याशिवाय त्याच दरम्यान मद्याची दरवाढही संभावते. यामुळे साठा अधिकच वाढविला जातो. बरेचदा सहा महिने ते वर्षभर लागेल येवढा साठा बरेच विक्रेते करून ठेवतात. यंदा मार्चच्या मध्यातच मद्यविक्री बंद करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्टॉकची नोंदणी करून ठेवली. अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने लॉकडाऊनमध्ये उपराजधानीत सर्रास मद्यविक्री झाली.

मूळ किमतीपेक्षा पाचपट अधिक शुल्काची आकारणी केली गेली. मद्यविक्री सुरू करण्याची घोषणा होताच साठा पुन्हा स्टॉक चेक करण्याच्या सूचना मिळाल्या. पण, उपलब्ध मनुष्यबळ आणि मद्यविक्री दुकानांची संख्या लक्षात घेता स्टॉकचे मोजमाप अशक्य होते. बऱ्याच ठिकाणी स्टॉकची तपासणी केवळ कागदावरचे रकाने भरण्यापूरतीच मर्यादित राहिली. अधिकाऱ्यांनी सर्वेक्षणाच्या नावाखाली केवळ खानापूर्ती केल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केले. यामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनी याबाबतचा आढावा घेतला. तसेच साठा तपासणी करण्याच्या सूचना केल्या.

अधिकाऱ्यांवर कारवाई
लॉकडाउनदरम्यान जवळपास १५ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. यातील काही जणांचे परवानेच रद्द करण्यात आले तर काहींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांकडून यात कसूर झाल्याचे समोर आल्यात त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल.
प्रमोद सोनोने, अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग,नागपूर. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune District News: वसतिगृहातून तीन अल्पवयीन विद्यार्थी गायब; १८ दिवस उलटूनही ठावठिकाणा नाही, जुन्नर पोलिसांकडून शोध सुरू

Pune FDA Action: पुण्यात FDAची कारवाई, भूम-वाशीतील खवा-पेढा विक्रेते रस्त्यावर; आमदार तानाजी सावंतांकडून प्रश्नाची दखल

रविवारी गुरुचा अश्लेषा नक्षत्रात प्रवेश; 'या' ७ राशींच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी

Nilanga Drought: निसर्गाची अवकृपा अन् कृषी विभागाची आकडेवारी; निलंग्यात खरीप पिकांचे १०० टक्के नुकसान, अहवालात ७० टक्केच नोंद

Latest Marathi News Update : नागपुरातील इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाला डॉ. हेडगेवारांचं नाव

SCROLL FOR NEXT