Chicken Price Updates | Chicken Rates
Chicken Price Updates | Chicken Rates sakal
नागपूर

चिकनप्रेमींना महागाईच्या झळा; २३० रुपयांवर पोहोचला भाव

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : इंधन दरवाढ, कोंबडीच्या खाद्यान्नात झालेल्या दरवाढीमुळे चिकनच्या किंमतीत १५ ते २० टक्के वाढ झालेली आहे. ही विक्रमी वाढ असून प्रति किलो २३० ते २४० रुपये झाले आहे. मटणाचे भाव वाढल्याने मांसाहारी चिकनकडे वळले होते. मात्र आता चिकनचे भावही हळुहळू वाढू लागले आहे. त्यामुळे रविवारचा मांसाहाराचा मेनू महागला आहे. (Chicken Price Updates)

कोरोनाच्या पहिल्या लाटेत पोल्ट्री चालकांना चक्क कोंबड्या फेकून द्याव्या लागल्या होत्या तर कित्येकांनी फुकटात कोंबड्या वाटप कराव्या लागल्या. त्यानंतर काही महिन्यापूर्वी बर्ड फ्लूची अफवा पसरल्याने पोल्ट्री चालकांनी भीतीमुळे त्यावेळी कमी उत्पादन घेतले. आता सोयाबीन आणि मक्याच्या खाद्यात विक्रमी वाढ झाली आहे. तसेच चिकनच्या पिलांचे दरही वाढलेले आहे. पूर्वी कोंबडीच्या पालनपोषणासाठी ७०ते ८० रुपये खर्च येत होता. आता तो ११० ते १२० रुपयांवर गेला आहे. त्याच्याच परिणाम भाववाढीवर झाला आहे. सध्या किरकोळ बाजारात २३० ते २४० रुपये किलोने ब्रॉयलरची विक्री होत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत पोल्ट्री चालकांना कोंबड्या फेकून द्याव्या लागल्या होत्या तर कित्येकांना फुकटात वाटप कराव्या लागल्या. मात्र आता दीड वर्षानंतर चिकनचे दर दुप्पट झाले आहे.

दीड वर्षापूर्वी चिकनचे दर १२० ते १४० रुपये किलोपर्यंत असायचे. उत्पादन आणि मागणी यामध्ये जास्त फरक नसल्याने किमती सुद्धा स्थिर राहत होत्या. मात्र लॉकडाऊनमध्ये अनेक पोल्ट्री चालकांना फटका बसल्याने त्यांना पोल्ट्री बंद कराव्या लागल्या. पोल्ट्रीसाठी लागणारे खाद्याचे दर दुप्पट झाले, पिलांच्या किमती वाढल्याने पोल्ट्री चालक अडचणीत आले आहेत. यामुळे नाइलाजाने त्यांना कोंबडीचे दर वाढवावे लागले आहेत.

गावरानीचे दर कायम

बॉयलर चिकनचे दर वाढत असताना दुसरीकडे गावरानी चिकन (जिवंत कोंबडा) ५५० ते ६०० रुपये किलो असे कायम आहे. हैदराबादी कोंबडीचे दर ३६० ते ३८० रुपये किलो आहे.

''कोंबडीच्या खाद्याची भाववाढ आणि इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे ठोक बाजारात चिकनचे भाव वाढल्याने दरवाढ करावी लागली अजून भाव वाढण्याची शक्यता आहे.''

- हरीश पराते, धोटे चिकन सेंटर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रचारसभास्थळी नरेंद्र मोदी दाखल

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

SCROLL FOR NEXT