raosaheb danve sakal
नागपूर

मुख्यमंत्री नसल्याने काय फरक पडणार : रावसाहेब दानवे

तीन पक्षांचे आघाडी सरकार निर्णयच घेत नाही

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महाविकास आघाडी सरकार तीन पक्षाचे आहे. ते राज्याच्या हिताचा कुठलाच निर्णय घेत नाही. त्यामुळे अधिवेशानात मुख्यमंत्री आले काय किंवा नाही यामुळे काहीच फरक पडत नाही असा टोला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लागावला.

दानवे यांनी आज सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांसोबत संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्राला ठावूक आहे. त्यांनी लावकर बरे व्हावे आणि जनतेच्या सेवेत रुजू व्हावेत या आमच्या सदिच्छा आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून मंत्रालयात किती वेळा आले, राज्यात किती दौरे केले हासुद्धा एक प्रश्नच आहे. राज्यावर आलेल्या संकाटतही ते बाहेर पडल्याचे दिसत नाही. कुठल्याही कार्यक्रमात त्यांचा सहभाग नसतो. त्यामुळे अधिवेशनाचे काय घेऊन बसला, असेही दानवे उपहासाने म्हणाले. दुसरीकडे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी रोज सभागृहात उपस्थित होते.

आमचे सरकार सर्व विषयावर चर्चा करायला तयार आहे. मात्र विरोधकांनी केवळ गोंधळच घालायचे ठरविल्याचे दिसते. या देशात परकीयांनी आक्रमणे करून हिंदूच्या भावना दुखावल्या. शेकडो मंदिरे उध्वस्थ केलीत. नावे बदलली. परकीयांना आपण देशबाहेर घालवले. आता हिंदूंच्या भावनांसाठी नावे बदलली तर काय झाल? औरंगाबादचं नाव संभाजीनगर व्हावे ही आमची मागणी असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

पेपर फुटीची सीबाय चौकशी व्हावी

पेपरफुटीमुळे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय झाला. हा फार मोठा भ्रष्टाचार आहे. याची सिबीआय चौकशी व्हावी. आमच्या काळात नेमलेल्या संस्था असल्या तरीही आमच्या काळात असे प्रकार खपवून घेतले नसते. आता घोटाळा कोणी केला याची सखोल चौकशी व्हावी, असेही दानवे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT