Child drowns in Kanhan river 
नागपूर

मुलगा घरी न आल्याने कुटुंबीयांनी घेतला शोध; नदीकाठावर कपडे आढळताच दाटून आले अंतःकरण

किशोर गणवीर

खापा (जि. नागपूर) : कन्हान नदीवर तीन मित्र पोहायला गेले असता पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन एकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना खापा येथील कन्हान नदीवरील हनुमान घाट परिसरात घडली. योगेश रमेश गोखे (वय ११, रा. लांबटपुरा, खापा) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खापा येथील हनुमान घाट परिसरात कन्हान नदीवर गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमार तिघे मित्र पोहायला गेले. पोहता पोहता योगेश खोल पाण्यात गेला असता त्याला बाहेर येणे कठीण झाले. तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्यावेळी एका मित्राने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; पण पाण्याच्या तीव्र प्रवाहाने गटांगळ्या खात तो वाहून गेला. त्याचे मित्र घाबरून घरी परत आले.

सविस्तर वाचा - कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी डॉ. बंग यांनी दिला सल्ला!

सायंकाळी योगेश घरी परत न आल्याने त्याच्या आई-वडिलांनी शोधाशोध केली. पण कुठेच दिसून न आल्याने खापा पोलिसांत तक्रार दाखल केली. खापा पोलिसांनी घटना दाखल झाल्यावर शोध घेतला असता योगेशचे नदीकाठावर कपडे आढळून आले. खापा पोलिसांनी योगेशचा शोध घेणे सुरू केले. पण योगेशचा पत्ता लागत नसल्याने खापा पोलिसांनी नागपूर येथून ‘रेस्कू टिम’ला पाचारण केले.

शुक्रवारी रेस्कू टिमने शोधमोहीम सुरू केली. कन्हान नदीच्या रामडोंगरी घाटावरील नदीकाठावर सायंकाळी पाच वाजतीच्या सुमारास योगेशचा मृतदेह आढळून आला. खापा पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. खाप्याचे ठाणेदार ऐकरे यांच्या मार्गदर्शनात‍ बारई मेजर तपास करीत आहे.

वडील रमेश गोखे हे मूक

एकुलता एक मुलगा दगावल्याने योगेशच्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मृत योगेशचे वडील रमेश गोखे हे मूक असून मिस्त्री काम करतात. मोलमजुरी करुन ते कुटुंबाचा चरितार्थ चालवितात.

परिसरात शोकाकुल वातावरण

परिस्थिती हालाखीची आहे. मुलगा मोठा झाल्यावर काहीतर सुख मिळेल, परिस्थिती सुधारेल, अशी स्वप्ने बघितलेल्या आई-वडिलांचे योगेशच्या मृत्यूने बातमी ऐकताच अंतःकरण दाटून आले. योगेशच्या मृत्यूने परिसरात शोकाकुल वातावरण आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minister Narhari Zirwal : मंत्री झिरवाळांच्या बालेकिल्ल्यातच ACB ची 'रेड'; महिला सरपंचाला लाच घेताना रंगेहाथ पकडलं, 50 हजारांची मागणी अन् 15 हजारांत...

Pune APMC: पुणे बाजार समितीतील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण करा; विरोधक आक्रमक, अहवाल सादर करण्याचे आदेश!

CJI Suryakant सकाळी पेपर… संध्याकाळी याचिका! सीजेआय सूर्यकांत यांच्या एका वाक्याने उघड झाला मोठा ‘खेळ’

T20 World Cup: दक्षिण आफ्रिका - वेस्ट इंडीज सामनाच ठरवणार भारताचं भविष्य! जाणून घ्या सर्व शक्यता अन् समीकरणं

Mumbai Pune Expressway traffic: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची महाकोंडी! पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग ठप्प, प्रवास ठरतोय शिक्षा!

SCROLL FOR NEXT