Child protection team stopped child marriage 
नागपूर

बाल संरक्षण पथकाने थांबविला बालविवाह; मात्र, अधिकारी व वऱ्हाड्यांमध्ये झाली ‘तू-तू, मै-मै’

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिटेसूर गावात शनिवारी एका १६ वर्षीय मुलीचा बालविवाह होणार असल्याची खात्रीशीर माहिती बाल संरक्षण पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिस विभाग व बाल संरक्षण पथकाने संयुक्त कार्यवाही करून बालविवाह थांबविला. नागपूर जिल्ह्यात नऊ महिन्यांतील ही नववी बालविवाह रोखण्याची कार्यवाही आहे.

प्राप्त माहितीनुसार, पिटेसूर गावामध्ये १६ वर्षीय मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळताच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार मानकापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वैजयंती मंडवधरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, संरक्षण अधिकारी विनोद शेंडे, कायदा व परिवीक्षाधीन अधिकारी सुजाता गुल्हाणे, ग्रामविकास अधिकारी इंद्रपाल ढोकणे, सरपंच दीपक राऊत, अंगणवाडी सेविका उमा उईके, सामाजिक कार्यकर्ता सुनीता ठाकरे, मोहम्मद हफीस यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. तसेच बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये मुलीचे वय १८ वर्ष व मुलाचे वय २१ वर्ष पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत लग्न करता येत नाही. केल्यास बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये कार्यवाही पात्र राहू, असे आई-वडिलांकडून बंधपत्र घेण्यात आले.

अधिकारी व वऱ्हाड्यांमध्ये तू-तू, मै-मै

बालविवाह रोखण्यासाठी गेलेल्या बालसंरक्षण समितीच्या अधिकाऱ्यांसोबत वऱ्हाड्यांनी तू-तू, मै-मै करून प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस आणि अधिकाऱ्यांनी मिळून त्यांची समजूत काढली आणि बालविवाह होऊ दिला नाही. तरीही मुलीचा पुन्हा विवाह होण्याच्या शंकेने अधिकाऱ्यांनी मुलीला बालसुधारगृहात पाठविले.

साक्षगंध करीत असल्याचा बनाव

कारवाई गेलेल्या पोलिस व अधिकाऱ्यांना पाहुणे मंडळींनी वाद घालत आम्ही लग्न करीत नसून साक्षगंध करीत असल्याचे सांगितले. लग्न थांबविल्यानंतरही पुन्हा दुसऱ्या ठिकाणी नेऊन मुलीचे लग्न लावण्याची तयारी वऱ्हाडी मंडळींनी चालवली होती. त्यामुळे समितीच्या अधिकाऱ्यांनी मुलीला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात रवानगी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT