Child suicide after mother angry over mobile 
नागपूर

मोबाईलच्या कारणावरून आई रागावल्याने मुलाची आत्महत्या

अनिल कांबळे

नागपूर : शेजारच्या मुलाने मोबाईल हिसकावून घेतल्यामुळे त्याच्यासोबत वाद झाला. वाद झाल्यानंतर घरी आलेल्या मुलावर आई संतापली. मात्र, मुलाने आईच्या बोलण्याचा राग मनात धरून घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना अंबाझरी परिसरात घडली. आकाश रमेश श्रीवास्तव (वय 26, रा. संजयनगर, पांढराबोडी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश श्रीवास्तव होम पेशंटची देखभाल करण्याचे काम करीत होता. त्याला वडील नसून आई आणि आजीसह तो राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते. मात्र, आईचा आज्ञाधारक मुलगा म्हणून त्याची ओळख होती. गेल्या दोन दिवसांपूर्वी त्याचा मोबाईल शेजारी राहणाऱ्या युवकाने हिसकावून घेतला. त्यामुळे तो निराश होता. त्याने आईला सांगून मोबाईल मागून आणण्यासाठी तगादा लावला होता.

मात्र, शेजारी राहणारा युवक मोबाईल घेऊन पळून गेल्याने मोबाईल परत मिळत नव्हता. बुधवारी आकाश सायंकाळी पाच वाजता घरी आला. त्याने शेजारच्या मुलाकडून मोबाईल आणून देण्यावरून आईसोबत वाद घातला. आईने त्याच्यावर आरडाओरड केली आणि कानाखाली वाजवली. आईने कानशिलात मारल्यामुळे त्याला राग आला. तो वरच्या माळ्यावर गेला. त्याने रूममध्ये गेल्यानंतर चादरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सायंकाळी सहा वाजता त्याची आई चहा घेण्यासाठी त्याला बोलवायला वरच्या माळ्यावर गेली. तिने आवाज दिल्यानंतरही आकाश प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे आईने दार ढकलले. आकाशला गळफास घेतलेल्या स्थितीत पाहताच ती भोवळ येऊन खाली पडली. काही वेळानंतर आजी रूमकडे आली असता तिलाही धक्‍का बसला. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या प्रकरणात शेजारी राहणाऱ्या मुलाची काय भूमिका आहे? याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

संपादित : अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gondia Crime : वडिलांसोबत शेतात गेलेल्या चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; अचानक झडप मारली अन्…

Kolhapur TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक वाढ! कऱ्हाडातील तिघांची नावे निष्पन्न; आरोपींची संख्या २९ वर

Saksham Tate Case: भीम जयंतीच्या मिरवणुकीत आंचलचे वडिल आंचल आणि सक्षमसोबत नाचले | Anchal Mamidwar | Sakal News

Dhananjay Munde: ''परळीतल्या गल्लीबोळातला स्टार प्रचारक...'', देशमुखांची धनंजय मुंडेंवर सडकून टीका

Solapur politics : 'गोल्डन वूमन श्रीदेवी फुलारे भाजपमध्ये'; निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सोलापुरात मोठा धक्का..

SCROLL FOR NEXT